scorecardresearch

Premium

“हे पाळलेल्या कुत्र्याचे दुकान नाही”, ॲड. गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली…

सभेत एका गटाने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ कधी होणार ते आधी सांगा, असे विचारले. त्यावरून ॲड. सदावर्ते भडकले आणि त्यांनी अर्वाच्च भाषेत बोलत प्रश्न विचारणाऱ्या लोकांना धक्के मारून बाहेर काढण्यास कार्यकर्त्यांना सांगितले.

yavatmal adv gunaratna sadavarte, adv gunaratna sadavarte slip of tongue
"हे पाळलेल्या कुत्र्याचे दुकान नाही", ॲड. गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली… (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

यवतमाळ : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या सभेनिमित्त यवतमाळमध्ये आलेले एसटी कर्मचारी नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची जीभ घसरली. यवतमाळ शहरातील टिंबर भवन येथे गुरुवारी सदावर्ते यांची विदर्भाचा बुलंद आवाज सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेवेळी दोन गटांत जोरदार वाद झाला. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे या मुद्दयावरून चर्चा सुरू असताना जमलेल्या सभेत एका गटाने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ कधी होणार ते आधी सांगा, असे विचारले. त्यावरून ॲड. सदावर्ते भडकले आणि त्यांनी अर्वाच्च भाषेत बोलत प्रश्न विचारणाऱ्या लोकांना धक्के मारून बाहेर काढण्यास कार्यकर्त्यांना सांगितले.

या सभेला एसटी कर्मचारी जमले होते. एसटीच्या संदर्भातल्या विषयांवर बोलण्यास एक गट सांगत होता. तेव्हा आपले विषय मांडण्यापूर्वी माहिती द्यायची, त्याला वेळ दिली जाते, असे सांगून हे शरद पवारांनी बांधून ठेवलेल्या संदीप शिंदेसारख्या पाळलेल्या कुत्र्याचे दुकान नाही, असे सदावर्ते म्हणाले. त्याचवेळी त्याला धक्के मारून बाहेर काढा. शिस्त काय असते ते समजायला पाहिजे, असे आदेश सदावर्ते मंचावरूनच देत होते. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले.

OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
satyashodhak kamaltai vichare, satyashodhak kamaltai vichare information in marathi,
स्त्रियांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सत्यशोधक कमलताई विचारे
Abhishek Ghosalkar Murder
Abhishek Ghosalkar Shot Dead : “आधी अंधार केला, मग कार्यालयात नेलं अन्….”, प्रत्यक्षदर्शीने सांगितला घोसाळकर यांच्या हत्येचा थरारक घटनाक्रम
lalit kala kendra ram leela pune marathi news, pune ram leela controversy marathi news
पुण्यामधल्या ललित कला केंद्रात नेमकं काय झालं? ‘नाटका’नंतरच्या ‘नाटकां’चं काय करायचं?

हेही वाचा : हद्दच झाली… आता कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पद भरणे आहे… ‘या’ जिल्ह्याने काढली जाहिरात

बँकेच्या सभेच्या अहवाल पुस्तकावर प्रभू श्री राम, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आहे. शरद पवार यांना धडा शिकवला. तसाच धडा विरोधक संदीप शिंदे यांना शिकवला जाईल. हिंदू राष्ट्रात श्रीरामाच्या विचारात बदल होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी सदावर्ते यांनी विरोधकांना दिला. जनसंघ केवळ दोनच संघ मानते. एक तथागत गौतम बुद्धांचा संघ आणि दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दोन्ही संघ वैचारिक प्रगल्भ असल्याची पुष्टीही यावेळी सदावर्ते यांनी जोडली.

हेही वाचा : वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी नव्या सॅटेलाईटची निर्मिती, जाणून घ्या सविस्तर…

अजित पवार यांना आव्हान

यावेळी सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत अजित पवार यांना आव्हान दिले. दिवाळीच्या चार दिवस अगोदर एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण आणि सातवा आयोग या कामात पवार यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला किंवा अर्थखाते आहे म्हणून काहीही केले तर दिवाळीच्या अगोदर एसटी कर्मचारी काम बंद करतील, असा इशारा यांनी दिला. एसटी कर्मचाऱ्यांनी या घोषणेला जोरदार पाठिंबा दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In yavatmal adv gunaratna sadavarte slip of tongue when asked about salary increment of st employees nrp 78 css

First published on: 29-09-2023 at 17:12 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×