यवतमाळ : नेर येथे मध्यरात्री स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र इमारत मालकाच्या सतर्कतेने चोरट्यांच्या लुटीचा डाव फसला. या घटनेनंतर शहरातील अन्य बँक कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

शनिवारच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांच्या टोळीने बँकेच्या मागील दाराचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेरे आणि सायरन सिस्टिमची तोडफोड केली. दरम्यान, चोरी होत असल्याची चाहूल इमारत मालक पटेल यांना येताच त्यांनी ही बाब तातडीने माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांना दूरध्वनीवरून सांगितली. त्यांनी ही माहिती लगेच ठाणेदार अनिल बेहराणी यांना कळविल्यानंतर पोलिसांचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले होते. अतिशय योजनाबद्ध केलेला कट इमारत मालकाच्या सतर्कतेने मोडीत निघाला.

पाच चोरटे तोंडाला रुमाल बांधून बँकेत दाखल झाले होते. चोरट्यांनी खिडकीची ग्रील तोडून आत प्रवेश मिळविला. परंतु, बरेच प्रयत्न करुनही ते बँकेचे लॉकर तोडू शकले नाहीत.मोठी रक्कम हाती लागेल या आशेने आलेल्या चोरट्यांची पळापळ झाली. रकमेसाठी त्यांनी बरीच तोडफोड केली. तोडफोडीच्या आवाजाने इमारत मालकांना जाग आल्याने त्यांची लुट फसली. त्यांनी पूर्वनियोजित कट आखला. त्यानुसार लुटीला मूर्तरूप देण्याचा प्रयत्नही केला.परंतु, त्यांच्या हाती काही लागले नाही. लुटीसाठी वापरलेले त्यांचे वाहन आणि चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेनंतर हे वाहन अमरावतीकडे गेल्याचेही यात दिसत आहे. या चित्रफितीच्या आधारे वाहनाचा शोध घेतला जात आहे. बँक व्यवस्थापक धनराज देशमुख यांनी बँकेची पाहणी केली असता चोरट्यांनी फ्रीजमधील कोल्ड्रिंकच्या सहा बाटल्याही चोरट्यांनी रिकाम्या केल्याचे आढळले .

चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर लॉकर्स फोडण्याचा तसेच प्रत्येक ड्रॉव्हर उघडून ठेवले होते. त्यांनी लॉकर तोडण्यासाठी कटर मशीन आणल्याचे परिस्थितीवरून लक्षात आले. या तोडफोडीत बँक प्रशासन व पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत बँकेचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. घटनेनंतर चोरांचे टोळके चार चाकी वाहनातून अमरावतीमार्गे पसार झाल्याची माहिती आहे.बँक कर्मचारी कोमल खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दामोदर वाघमारे करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलार्म वायर, डीव्हीआर घेऊन पोबारा

बँक लुटीसाठी पाच जणांचे टोळके बँकेत शिरले. त्यांना. मुख्य लॉकर तोडता न आल्याने झालेल्या तोडफोडीच्या आवाजातून त्यांची लुट अयशस्वी झाली. आपल्या लुटीचा डाव उधळल्यानंतर चोरट्यांनी स्वत:च्या बचावासाठी तसेच कुठलेही पुरावे पुढे येऊ नये, यासाठी अलार्म केबल तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.