यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी सायंकाळी व मध्यरात्री सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची, झाडांची पडझड झाली. रब्बी व उन्हाळी पिकांसह फळबागा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यात यवतमाळ, आर्णी, बाभुळगाव, कळंब, पुसद, महागाव, उमरखेड आदी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्याने अनेकांच्या घरांवरील छप्पर उडाले. आर्णी तालुक्यातील वृध्दाश्रमाचे छप्पर उडाल्याने वृद्धांची गैरसोय झाली. अनेक शाळांवरील टीनपत्र्याचे छप्पर उडाले.

हेही वाचा : सस्‍पेन्‍स कायम! चंद्रशेखर बावनकुळे म्‍हणतात, “अजून नवनीत राणा…”

Nanded, married couple suicide,
नांदेड : नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, कंधार तालुक्यातील कळकावाडीतील घटना
Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प

दुकाने, मोठमोठे फलक कोसळले. पावसाने गहू, हरभरा, ज्वारी, तीळ, भुईमूग आदी पिकांसह आंबा, पपई, टरबूज, संत्रा, केळी आदी फळबागांचे नुकसान झाले. यवतमाळ शहरात रात्री साडेअकराच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक टपऱ्या उडाल्या. अनेक नगरात झाडे उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचले. काही ठिकाणी विजेचे खांब आडवे झाले. त्यामुळे बहुतांश भागात रात्री वीज पुरवठा खंडित झाला. सकाळपर्यंत हा पुरवठा सुरळीत झाला नव्हता. सुदैवाने या अवकाळी पावसाने कुठेही जीवित हानी झाली नाही. मात्र नागरिकांची प्रचंड दाणादाण उडाली. प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.