scorecardresearch

Premium

सोयाबीनवर ‘यलो मोझॅक व्हायरस’, शेतकरी चिंतेत, उत्पादनात घट होण्याची भीती

या व्हासरसने केवळ विदर्भातील सोयाबीन पिकावरच नव्हे तर मध्य प्रदेश आणि तेलंगणातील सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला आहे.

soybean farmers yavatmal, yellow mosaic virus, yellow mosaic virus on soybean in yavatmal
सोयाबीनवर ‘यलो मोझॅक व्हायरस’, शेतकरी चिंतेत, उत्पादन घटण्याची भीती (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

यवतमाळ : संततधार पावसामुळे सोयाबीनचे पीक संकटात आले आहे. ‘येलो मोझॅक व्हायरस’मुळे ऐन शेंगधरणीच्या काळात सोयाबीनची झाडे पिवळी पडून वाळत आहे. गेल्या काही वर्षांपासून संकटाचा सामना करणारे शेतकरी येलो मोझॅकच्या आक्रमणामुळे पुन्हा संकटात सापडले आहे. या कीडीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. या व्हासरसने केवळ विदर्भातील सोयाबीन पिकावरच नव्हे तर मध्य प्रदेश आणि तेलंगणातील सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला आहे. या तीन राज्यांत सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वातावरणात निर्माण झालेल्या उष्ण आणि दमट वातावरणाने सोयाबीनवर हा व्हायरस आल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या व्हायरसमुळे सोयाबीनचे पीक अचानक वाळत आहे. त्याला किडीसह आतमधून पोखरले गेले आहे. सोयाबीन पिवळे आणि काळेही पडत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेंगावर काळे ठिपके आहेत. पानावरही डाग पडत आहेत. यातून शेंगा वेळेपूर्वी वाळत असल्याने शेंगा भरण्याचे प्रमाण थांबले आहे. या खरीप हंगामात अर्ली व्हेरायटी सोडून सोयाबीनच्या इतर व्हेरायटींवर मोठया प्रमाणात ‘येलो मोझॅक’चे आक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘फुले संगम’ नावाची सोयाबीनची व्हेरायटी शेतकऱ्यांना वाटली होती. शेतकऱ्यांनीसुध्दा विश्वास ठेऊन याच व्हेरायटीची मोठया प्रमाणात लागवड केली. आज हीच व्हेरायटी रोगाला बळी पडली आहे. या कीडीचा सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.

Petrol Price
Petrol-Diesel Price on 7 October: सर्वसामान्यांचा खिशावरील भार हलका होणार, पाहा आज कोणत्या शहरात पेट्रोल-डिझेल मिळतेय स्वस्त
palm mil
‘आनंदाच्या शिधा’मध्ये परदेशी पामतेल; सोयाबीन उत्पादकांमध्ये रोष, भाव कमी होण्याची चिंता
maharashtra rain update, yellow alert given in maharashtra, rain yellow alert for 3 days
सावधान! तीन दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात ‘यलो अलर्ट’
CM Eknath Shinde Video Viral
“बोलून मोकळं व्हायचं”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल! ओमराजे म्हणतात, “मराठा आरक्षणाविषयी अनास्था…”

हेही वाचा : वर्धा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आता नव्याने मतदार नोंदणी, जाणून घ्या सविस्तर…

सोयाबीनचे उत्पादन घटले तर याचा थेट परिणाम दरावरसुद्धा होणार असल्याने शेतकरी खचला आहे. कापसावर लाल्या रोग आल्यास ज्या प्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जाते त्याच धर्तीवर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी शासनाकडे केली आहे. कृषी विभागाने वाटलेल्या व्हेरायटीवरच अधिक कीड पडली आहे. मात्र कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करुन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत देण्याची मागणी पवार यांनी केली आहे. शासनाने दखल न घेतल्यास सोयाबीन बियाणे कंपनी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच कृषी विक्रेते यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा देवानंद पवार यांनी दिला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In yavatmal soybean yellow mosaic virus farmers worried about decline in production nrp 78 css

First published on: 28-09-2023 at 13:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×