MSBSHSE Maharashtra SSC 10th Board Result Passing Percentage महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्याच्या निकाल ९४.५७ टक्के लागला आहे. या निकालात मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.३८ इतकी आहे. तर, मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.९४ इतकी आहे.

अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी ३८ हजार ५८१ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ३८ हजार २१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी प्रावीण्य श्रेणीत ११ हजार १८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत १३ हजार ३८१ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत आठ हजार ८४२ तर, केवळ उत्तीर्ण श्रेणीत दोन हजार ७२८ विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात एकूण ३६ हजार १३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात १८ हजार ७१८ मुले तर, १७ हजार ४२१ इतकी मुलींची संख्या आहे.

हेही वाचा : मुलांपेक्षा मुलीच अव्वल! चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९४.०५ टक्के

तालुकानिहाय निकालाची टक्केवारी

यवतमाळ तालुक्याचा निकाल ९५.७८ टक्के लागला, तर नेर – ९६.१०, दारव्हा – ९३.७५, दिग्रस – ९३.१२, आर्णी – ९४.७८, पुसद – ९४.८५, उमरखेड -९६.१७, महागाव – ९७.६६, बाभूळगाव – ९४.२९, कळंब – ९२.७१, राळेगाव – ९४.८२, मारेगाव – ८७.९५, पांढरकवडा – ९२.७०, झरीजामणी – ९४.०७, वणी – ९२. १७, घाटंजी तालुक्याचा निकाल ९४.३८ टक्के आहे.