बुलढाणा: श्रीक्षेत्र माकोडी (तालुका मोताळा) येथे चातुर्मास समाप्ती निमित्त आज बुधवारपासून (दि २२) खोपडी बारस सोहळ्याचा विधिवत प्रारंभ झला आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत चैतन्य मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. श्रीहरी महाराज यांची उपस्थिती हजारो भक्तांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

मलकापूर, निरपूर, जळगाव, जामोद यासह पंचक्रोशीतील अनेक पायीदिंड्यांचे श्रीक्षेत्री आगमन झाले आहे. आज २२ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता काकड आरतीने महोत्सवाला सुरुवात झाली त्यानंतर पूजाविधी स्थापना व सकाळी ८ वाजता श्रीहरी महाराजांच्या हस्ते होमकुंड प्रज्वलित करण्यात आला. राम नामाच्या गजराने परिसर दुमदुमला. आरती, प्रसाद, होमहवन, दैनंदिन उपासना व नंतर प्रसाद वाटप हे आजचे दैनिक कार्यक्रम आहे. उध्या २३ नोव्हेंबरला पहाटे काकडा आरती, ७ ते ११ होमहवन, दुपारी आरती फराळ प्रसाद, त्यानंतर ३ ते ५ होमहवन यजमान जोडप्यांच्या हस्ते पार पडेल.

हेही वाचा – नागपूर : वैदर्भीय जितेशची भारतीय संघात निवड, ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० खेळणार…

हेही वाचा – चंद्रपूर : राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा बल्लारपूरच्या क्रीडा संकुलात, २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२४ नोव्हेंबर रोजी काकड आरतीनंतर सकाळी ८.३० वाजता रामनाम जपाची महाराजांच्या हस्ते यज्ञकुंडात पूर्णाहुती देण्यात येईल. सकाळी ९ वाजता श्रीहरी महाराजांचे मुख्य मार्गदर्शन होईल. भाविकांना श्रीहरी महाराजांच्या हस्ते कापड प्रसादाचे वितरण होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज निरपूरकर यांचे किर्तन, नंतर दुपारी नैवैद्य आरती झाल्यावर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. सायंकाळी तुळशी विवाहाने सोहळ्याची सांगता होईल.