लोकसत्ता टीम

नागपूर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि ‘हिट मॅन’ अशी बिरुदावली मिरवणारा रोहित शर्मा याचे नागपूर कनेक्शन माहिती आहे का?

हो.. रोहितचा जन्म नागपुरात झाला असून दोन वर्ष तो नागपुरातच होता. ३० एप्रिल १९८७ ला नागपुरात रोहित शर्माचा जन्म झाला आणि दोन वर्षे तो येथेच आजोळी होता. रोहितचे मामा-मामी आजही नागपुरात राहतात. लहान असताना अनेक वेळा शाळेच्या सुट्ट्यांमध्ये रोहित शर्मा नियमितपणे रामेश्वरी परिसरात द्वारकापुरीत आपल्या मामा-मामीच्या घरी यायचा. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या मामाच्या घरी उत्साहाचे वातावरण आहे.

आणखी वाचा-अमरावती : मांडूळ साप विक्रीचा प्रयत्न…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*शांत स्वभावाचा मात्र आक्रमक क्रिकेट खेळणारा रोहित नक्कीच वर्ल्ड कप जिंकणार असा विश्वास त्याच्या मामा मामी आणि कुटुंबीयांना आहे… रोहित आणि भारतीय संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.