नागपूर : रेल्वेचे तिकीट, धावत्या गाडीत जेवण, मदत’ किंवा तक्रार यासह प्रवासादरम्यान आवश्यक गोष्टी रेल्वेने एका क्लिकवर उपलब्ध केल्या आहेत. सिंगल साइन व ई-वॉलेटची सुविधा या ॲपमध्ये सिंगल साइन ऑन (एसएसओ) ची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे वापरकर्ते पूर्वी वापरत असलेल्या ‘यूटीएस ऑन मोबाईल’ किंवा ‘रेल कनेक्ट’ या ॲपचा लॉगिन वापरून सहज साइन करू शकतात. आर-वॉलेट ही सुविधाही यामध्ये समाविष्ट केली आहे. त्यातून जलद आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट करता येते. यात सुरक्षेसाठी ‘एमपीन’ व बायोमेट्रिक प्रमाणीकरणाचे पर्याय दिले

डिजिटल इंडिया मोहीम अंतर्गत ‘रेल वन’ ॲपमध्ये रेल्वे प्रवासातील सर्वच सुविधा एकत्रित करण्यात आल्या असून, यातून प्रवाशांना आता वेगवेगळे ॲप्स किंवा वेबसाईट्स वापरण्याची गरज राहणार नाही. विशेष म्हणजे हे ॲप प्रवाशांसह मालगाडी सेवा घेणाऱ्या व्यापाऱ्यांसाठीही उपयोगी ठरणार आहे. आरक्षित, अनारक्षित व प्लॅटफॉर्म तिकीट, रेल्वेचे प्रत्यक्ष लोकेशन, पीएनआर चौकशी, रैल मदत, जेवणाचे बुकिंग एवढेच नाही तर मालवाहतुकीशी संबंधित चौकशी अशा वेगवेगळ्या ॲपमध्ये मिळणाऱ्या सुविधा आता एकाच ॲपमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. मध्यरेल्वेने यासाठी ‘रैल वन’ हे ॲप विकसित केले आहे. वेगवेगळे ॲप वापरण्यापेक्षा हा एकच ॲप प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असा विश्वास मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे.

  • ॲपच्या मुख्य सुविधा आरक्षित, अनारक्षित व प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग
  • गाडीचे लोकेशन (रिअल-टाइम रनिंग स्टेटस)
  • पीएनआर तपासणी व चौकशी
  • प्रवास नियोजन व गाडी वेळापत्रक
  • ऑनबोर्ड जेवण बुकिंग (ई-कॅटरिंग सेवा)
  • रेल मदत’ तक्रार निवारण यंत्रणा आहेत.
  • मालवाहतूक संदर्भातील चौकशी
  • सरळ इंटरफेस गेस्ट लॉगिनचा पर्याय

या ॲपचा इंटरफेस वापरण्यास सोपा आणि आकर्षक असून, नव्या वापरकर्त्यांसाठी फक्त प्राथमिक माहिती देऊन नोंदणी करता येते. तसेच फक्त चौकशीसाठी ॲप वापरणाऱ्या युजर्ससाठी गेस्ट लॉगिनची सोयही दिली असून ॲप प्ले स्टोअर आणि आयओएस ॲप स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे.