दैनिक चाचणीत ९.७९ टक्केच अहवाल सकारात्मक; २४ तासांत २० मृत्यू; ६६० नवीन बाधितांची भर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : जिल्ह्य़ात करोना संक्रमण कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. २४ तासांत २० मृत्यू झाले असून नवीन ६६० बाधितांची भर पडली आहे. दिवसभरात जिल्ह्य़ात झालेल्या ६ हजार ७४१  चाचण्यांमध्ये केवळ ६६० म्हणजे ९.७९ टक्के अहवाल सकारात्मक आले आहेत.

जिल्ह्य़ातील एकूण ६ हजार ७४१ चाचण्यांतील ५ हजार ५०७ चाचण्या शहरात तर १ हजार २३७ चाचण्या ग्रामीण भागात झाल्या. त्यात २ हजार २३३ आरटीपीसीआर तर ४ हजार ४०२ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. एकूण ६६० नवीन बाधितांमध्ये शहरातील ४३२, ग्रामीण २२० तर जिल्ह्य़ाबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील बाधितांची संख्या ६८ हजार ९८४, ग्रामीण १८ हजार ४०७, जिल्ह्य़ाबाहेरील ४९९ अशी एकूण ८७ हजार ८९० वर पोहचली आहे. दिवसभरात शहरात दगावलेल्या २० रुग्णांत शहरातील ७, ग्रामीणच्या ५, जिल्ह्य़ाबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार १९, ग्रामीण ५०४, जिल्ह्य़ाबाहेरील ३१७ अशी २ हजार ८४० वर पोहचली आहे.

विदर्भातील मृत्यू

(१३ ऑक्टोबर)

जिल्हा                  मृत्यू

नागपूर                      २०

वर्धा                          ०५

चंद्रपूर                       ०३

गडचिरोली                ००

यवतमाळ                ०१

अमरावती                ०३

अकोला                      ०४

बुलढाणा                    ०५

वाशीम                       ००

गोंदिया                      ००

भंडारा                        ०३

एकूण                        ४४

रुग्णालयातील बाधितांची संख्या दोन हजारावर

शहरात  ५ हजार ३, ग्रामीण भागात २ हजार ५७६ असे एकूण ७ हजार ५७९ सक्रिय करोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी विविध रुग्णालयांत २ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  सुमारे ४ हजार ९०२ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

करोनामुक्तांचे प्रमाण ८८ टक्यांवर

शहरात दिवसभरात ६४६, ग्रामीण २८७ असे एकूण ९३३ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील करोनामुक्तांची संख्या ६१ हजार ६९१, ग्रामीण १५ हजार ७८० अशी एकूण ७७ हजार ४७१ वर पोहचली आहे. आजपर्यंत आढळलेल्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ८८.१५ टक्के आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indications of corona infection declining in nagpur zws
First published on: 14-10-2020 at 00:32 IST