उद्योग राज्याबाहेर गेले म्हणून विरोधकांकडून केली जाणारी बोंबाबोंब राजकीय आहे. ती शिंदे- फडणवीस सरकार मोडून काढेल आणि विदर्भातील उद्योग क्षेत्राचा विकास केला जाईल, असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरसह राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भ विकास परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते.

वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला अजय संचेती, ललित गांधी आदी मान्यवर चेंबरचे पदाधिकारी उपस्थित होते. सामंत म्हणाले. गेल्या अडीच वर्षात उद्योग क्षेत्रात कुठलेही पॅकेज जाहीर करण्यात आले नाही. ज्या सवलती मिळत होत्या त्या बंद करण्यात आल्या. मात्र, शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्या टप्प्यात आम्ही १२०० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात १२०० कोटी आता आणि नागपूर अधिवेशनात सहा हजार कोटी देणार असून त्या संदर्भात मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव देण्यात आला आहे.

हेही वाचा: नागपूर: विदर्भ साहित्य संघाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

विदर्भाला ज्या काही उद्योगासंबंधी सवलती मिळतात त्या सर्व दिल्या जातील. तीन महिन्यात ७१ हजार कोटीचे महाराष्ट्रातील प्रकल्पांना मंजुरी दिली, त्यात ४१ हजार कोटीचे प्रकल्प विदर्भातील आहे. ४१ हजार २२० कोटीचे प्रकल्प मंजूर केले असून त्यात ३२ हजार लोकांना रोजगार दिला आहे.

हेही वाचा: ‘नासुप्र’च्या भूखंड वाटप प्रकरणात कोण कुठे चुकले?; अधिकाऱ्यांवर ठपका ठेवून कर्तेधर्ते मोकळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भात ‘ट्रायबल इंडस्ट्रीयल पार्क’

विदर्भातील आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ट्रायबल इंडस्ट्रीयल पार्क’ येत्या फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित करीत आहोत. असे उदय सामंत यांनी सांगितले.