विद्यापीठाकडून योजनेबाबत निर्णयच नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना बिनव्याजी शैक्षणिक कर्ज देणारी ‘विद्याधन योजने’ला विधिसभेच्या बैठकीत मान्यता दिली होती. मात्र, मागे पाठ पुढे सपाट, असेच काम सुरू असल्याने विद्यार्थ्यांसाठी आशादायी अशी ‘विद्याधन योजना’ ढेपाळली आहे.

 विधिसभा सदस्य विष्णू चांगदे यांनी ‘विद्याधन योजना’चे ठरावा ऑक्टोबर २०१८ मध्ये मांडला होता. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे गोंदिया जिल्ह्यतील दुर्गम क्षेत्रापासून ते नागपूर शहरापर्यंत विस्तारलेले आहे. त्यामुळे विविध सामाजिक व आर्थिक स्तरातील विद्यार्थी विद्यापीठात शिकतात. अशा दोन्ही स्तरातील अभ्यासू विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कक्षा वृंदावण्यासाठी व कमकुवत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्याधन योजना’ राबविण्यात येईल असा ठराव आहे. या योजनेत विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बिनव्याजी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. या योजनेची व्याप्ती व नियम तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विद्यापीठ स्तरावर समितीचे गठण करण्यात आले होते. त्यामुळे योजना लवरकच सुरू होईल व विद्यार्थ्यांसाठी ही योजना चांगलीच लाभदायी ठरेल असा विश्वास होता. मात्र, अद्यापही या योजनेला गती नसल्याचे दिसून येत आहे. योजनेसंदर्भात कुठलाही निर्णय अद्याप झालेलाच नाही. त्यामुळे ही योजना अडकून असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानी सांगितले.

करोना काळात गरजेची

करोनाच्या दोन वर्षांत अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे पालकांचे छत्र हरविले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण सोडण्याची वेळ आली. अशावेळी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्याधन योजना’च्या माध्यमातून विद्यापीठाद्वारे या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करता आली असती. मात्र, केवळ समित्यांची मागणी करुन त्यात जाऊन काम न करण्याच्या प्रवृत्तीमुळेच ही योजना थंडबस्त्यात पडली असल्याचे दिसून येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interest free educational loan scheme collapsed ysh
First published on: 09-11-2021 at 00:19 IST