scorecardresearch

Premium

मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेल्या रविकांत तुपकरांना शासकीय बैठकीचे निमंत्रण; म्हणाले…

बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर तुपकर यांना शासनासोबतच्या बुधवारच्या बैठकीचे निमंत्रण प्राप्त झाले.

Ravikant Tupkar left for Mumbai
मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेल्या रविकांत तुपकरांना शासकीय बैठकीचे निमंत्रण; म्हणाले… (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

बुलढाणा : ‘अन्नत्याग’ कायम ठेवून शेतकरी नेते रविकांत तुपकर शेकडो शेतकऱ्यांसह मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी आज, मंगळवारी बुलढाण्याहून मुंबईकडे रवाना झाले. जेमतेम दीड तासांतच बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर त्यांना शासनासोबतच्या बुधवारच्या बैठकीचे निमंत्रण प्राप्त झाले.

न्यायालयाने जामिनावर सुटका केल्यावर तुपकर यांनी सोमठाणा (ता. चिखली) येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले. एल्गार आंदोलन कथितरीत्या दडपल्याच्या निषेधार्थ अन्नत्याग सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पूर्वघोषित कार्यक्रमानुसार आज, मंगळवारी दुपारी १ वाजता तुपकरांसह कार्यकर्ते, शेतकरी यांच्या वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. दरम्यान, नाट्यमय घडामोडीत बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील जांब या गावात खास निरोप घेऊन अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांचा खास निरोप घेऊन हे अधिकारी आले होते.
अपर जिल्हाधिकारी विंचनकर, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, बुलढाणा उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे हे खास ‘खलिता’ घेऊन आले. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या पत्रात सोयाबीन-कापूस आंदोलनप्रकरणी २९ नोव्हेंबरला सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तुपकरांसोबत बैठक लावण्यात आल्याचे नमूद आहे. यामुळे तुपकरांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली.

gadchiroli medigadda dam marathi news, medigadda dam became dangerous marathi news, medigadda dam cracks marathi news
धोकादायक ‘मेडीगड्डा’ धरणामुळे दोन राज्यांतील नागरिकांचा जीव टांगणीला! राजकीय आरोप- प्रत्यारोप
Youth Congress officials pune
पुणे : पोलिसांकडून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड, भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा डाव फसला
Ahmednagar lawyers gate Collector office
नगरमध्ये मोर्चेकरी वकील चढले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर; फेकल्या पाण्याच्या बाटल्या!
Case of challenge to draft Kunbi certificate to Marathas High Court refuses to hear urgent plea of OBC organization
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मसुद्याला आव्हानाचे प्रकरण : ओबीसी संघटनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

हेही वाचा – माजी मंत्री सुनील केदार आरोपी असलेल्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाचा निकाल पुढे ढकलला

हेही वाचा – हिंगोलीच्या सभेला का गेलो नाही, वडेट्टीवार स्पष्टच बोलले

निमंत्रणावर काय म्हणाले तुपकर?

या शासकीय शिष्टाई व पत्राबद्दल तुपकरांनी सहकाऱ्यांसमवेत चर्चा केली. बुधवारची बैठक यशस्वी झाल्यावरच अन्नत्याग मागे घेऊ, असा निर्णय त्यांनी जाहीर केला. यानंतर तुपकर आणि सहकारी पुढील प्रवासासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Invitation of government meeting to ravikant tupkar who left for mumbai to take over the ministry scm 61 ssb

First published on: 28-11-2023 at 19:30 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×