नागपूर : पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ ब्रीज इंजिनिअर्सच्या (आयआयबीई) वतीने महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना शुक्रवारी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात प्रतिष्ठेचा ‘जीवन गौरव’ (लाईफ टाईम अचिव्हमेंट) पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. दीक्षित यांना कन्सुमाचे व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन सुब्बा राव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, आयआयबीईचे अध्यक्ष विनय गुप्ता यांनी प्रशस्तीपत्रकाचे वाचन केले. या पुरस्काराचे श्रेय यांनी महामेट्रोच्या सहकाऱ्यांना दिले. तंत्रज्ञानातील बदल आणि नवीन तंत्रे येत असताना, आपण आपल्या पुढच्या पिढीला प्रशिक्षण देणे, बदलांसाठी तयार करणे अत्यावश्यक आहे, असे दीक्षित म्हणाले. महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाबाबत सादरीकरण केले.