वाशीम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील माता कमलेश्वरी मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मूर्तीवरील ५० हजार रुपये किंमतीचे दागिणे व दानपेटीतील रोख रक्कम, असा अंदाजे १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध व्यवसाय फोफावले आहेत. चोऱ्या व दिवसाढवळ्या हत्येच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली असून आता चोरट्यांना देवाचीही भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – ‘सेव्ह नागपूर-स्टॉप कोराडी एक्सपान्शन’ पर्यावरणवाद्यांची मोहीम; आक्षेप काय, वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माता कमलेश्वरी मंदिरात चोरी झाल्याचे शनिवारी सकाळी पुजारी व विश्वस्त दर्शनासाठी मंदिरात गेले असता उघडकीस आले. संस्थानचे अध्यक्ष उद्धव पाटील गोडे यांनी याबाबतची माहिती पोलीसांना दीली. किन्हीराजा येथे यापूर्वीदेखील चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्याचा अद्यापही उलगडा झालेला नाही. त्यातच मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊ, असे ठाणेदार राठोड यांनी सांगितले.