नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी वक्फ बोर्ड संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत काही मुस्लिम श्रोत्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्या भाषणावरील आक्षपामुळे न्यायमूर्ती हक्क यांना त्यांचे भाषण आटोपते घ्यावे लागले.विदर्भ मुसलीम इटिलेक्चुअल फोरमच्यावतीने शनिवारी इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये सामान यांच्या ‘हिस्ट्री ऑफ वक्फ इन इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन वरिष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती झेड. ए. हक अध्यक्षस्थानी होते. दिल्ली येथील आयएएस कोच समीर आहमद सिद्दीकी फोरमचे अॅड.फिरदौस मिर्झा डॉ. शकील सत्तार, डॉ. आरीफ खान, आय. के. पाशा, डॉ. फैजानही उपस्थित होते.
या समारंभाचे अध्यक्ष न्या. हक यांनी वक्फ बोर्ड संदर्भातील २०२५ सुधारित कायद्यातील बहुतांश बाबी मान्य असल्याचे भाषणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले. तसेच त्यांनी वक्फ बोर्ड पेक्षा ट्रस्ट अधिक चांगले असल्याचे मत मांडले. ते म्हणाले, शेगाव देवस्थानचा विषय हाताळण्यासाठी सरकारने अॅड. फिरदौस मिर्झा यांची निवड केली, तसे टेकडी गणेशचा विषय हाताळण्याची संधी मी वकिली क्षेत्रात नवीन असताना मिळाली, हे दोन्ही विषय यशस्वीपणे मार्गी लागले. तेव्हा वक्फ बोर्डावर गैरमुस्लीम व्यक्ती येण्यास हरकत का असावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला, त्यावरुन उपस्थित श्रोत्यानी आक्षेप घेतला. राम मंदिरच्या ट्रस्टवर मुस्लीम व्यक्ती का नाही, असा प्रतिसवाल नागरिकांना केला. काही श्रोत्यांनी हक यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला, हक यांचे भाषण सुरू असताना अनेकांनी सभागृह सोडले. अखेर न्यायमूर्ती हक यांना भाषण आवरते घ्यावे लागले.
यावेळी बोलताना लेखक सैयद उमेदूर रहमान म्हणाले, वक्फ बोर्डात गैरव्यवहार आहे हे मान्य, पण तो दूर करण्याचा केंद्र सरकारने कायदा केला असता तर आम्ही त्याचे स्वागत केले असते, परंतु तसे न करता कायद करून वक्फच्या जमिनी बळकण्यासाठी प्रयत्न होत आहेत. हे करू नये, असे आवाहन लेखक सैयद उमेदूर रहमान यांनी केले.
उबेदूर रहमान यांनी वक्फचा इतिहास विषद केला. वक्फला ७०० वर्षांपासूनचा इतिहास असल्याचे सांगून अकबर, औरंगजेब यांच्यासह अनेक मुस्लीम राजांना गैरमुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्याचे दाखल्यास सांगितले. ते म्हणाले, वक्फचे सर्वांत जास्त नुकसान स्वतः मुसलमानांनी केले आहे. अक्फच्या कारभाराकडे सर्वसामान्य नागरिकांनी दुर्लक्षा केले. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, गैरव्यवहार हे वक्फचे वास्तव आहे. त्यासंदर्भात कोणीच आवाज उचलत नाही. वक्कला बाह्य शक्तीचा धोका दिसू लागताच आम्ही बोलू लागलो आहोत. मुस्लीम समाजाने वक्फच्या जमिनीचा दुरुपयोग केला, हे खरे आहे. पण, सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर जमिनीवर कब्जा केला आहे, असेही ते महणाले.
समीर अहमद सिद्दीकी यांनी अकबरापासून औरंगजेब पर्यतच्या शासकांनी बनारस, मथुरा, वृंदावन, पंढरपूर, अयो अयोध्येत हनुमान गढ़ी व इतर शेकडो हिंदू, जैन मंदिरांना वक्फच्या माध्यमातून जमिनी दान केल्याची तपशीलवार माहिती दिली. प्रास्ताविक अॅड. फिरदौस मिर्झा यांनी केले. संचालन परवेज सिद्दीकी यांनी केले. झाकीर खान यांनी आभार मानले.