वर्धा: सप्टेंबर आला की गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध सुरू होतात. मुर्त्यांचे बुकिंग सुरू पण झाले. आता मात्र एक संभ्रम आहे. बाप्पाला घरी कधी आणावे. कारण काही कॅलेंडर मध्ये १८ सप्टेंबरची तारीख दिली आहे.तर पंचांगकार १९ सप्टेंबर हाच योग्य मुहूर्त असल्याचे म्हणतात. राज्य शासनाने १९ सप्टेंबर पासून सुरू होणार असल्याचे सार्वजनिक गणेश मंडळास पुरस्कार देण्याची घोषणा करीत जाहीर केले आहे. सूर्य सिद्धांताच्या आधारे काही १८ तारखेचा मुहूर्त सांगतात. पण पंचांगकर्ते दा. कृ.सोमण हे १९ तारीखच योग्य असल्याचे कळवितात.

दृक गणिताच्या आधारे तृतीया समाप्ती १८ रोजी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी होते. त्यामुळे गणेश चतुर्थी १९ लाच येत असून या दिवशी गणेशाची स्थापना करावी, असे सोमण स्पष्ट करतात. तर गार्गी ज्योतिषी अजय शास्त्री हे पण १९ सप्टेंबर हाच मुहूर्त असल्याचे ठासून सांगतात.

हेही वाचा… नागपूर : पुतण्याच्या प्रेयसीसोबत काकाने केले लग्न, अन पुतण्याने केले काकूसह पलायन!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणपती स्थापनेस कोणताही दोष लागत नाही. मुहूर्त साधायचा झाल्यास १९ सप्टेंबरला दुपारी १ वाजून ४२ मिनिटापर्यंत तो आहे. पण याच दिवशी अंगारक योग असल्याने सूर्यास्तापर्यंत गणेश स्थापना करता येऊ शकते. तो मंगल काळ घेऊन येत असतो, असे गार्गी सांगतात.