तीन वर्षांनंतरही  केबल कोटिंगच्या निविदेला मुहूर्त मिळेना

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : महानिर्मितीच्या कोराडीतील ६६० मेगाव्ॉटच्या तीन औष्णिक वीजनिर्मिती संचाचे लोकार्पण  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१८ मध्ये झाले होते. या संचातून वीजनिर्मिती सुरू असली तरी प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण अग्निरोधक केबल कोटिंगची निविदा प्रक्रिया तीन वर्षे लोटल्यावरही अद्याप अपूर्णच आहे. या कामाची तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. परंतु, त्यातही  घोळ पुढे आला आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
pm modi launches infrastructure projects in tamil nadu
मोदींच्या हस्ते तामिळनाडूत १७,३०० कोटींच्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन; काँग्रेस आणि द्रमुकवर टीकास्त्र
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

कोराडीतील ६६० मेगाव्ॉटचे तिन्ही नवीन संच जागतिक दर्जाचे असून सगळ्यात स्वस्त वीजनिर्मितीसह प्रदूषण कमी करणारे असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री असताना केला होता. या ११ हजार ३२४ कोटींच्या १,९८० मेगाव्ॉटच्या तिन्ही संचांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ एप्रिल २०१८ ला झाले. तेव्हापासून या संचातून वीजनिर्मिती सुरू आहे.

वीजनिर्मितीनंतर वीज केबलमधून इतरत्र नेताना वाहिन्यांत प्रचंड उष्णता निर्माण होते. त्यात केबल वितळण्यासह इतरही धोके असतात. त्यामुळे या प्रकल्पाअंतर्गत सुमारे १.६० कोटींच्या अग्निरोधक केबल कोटिंगच्याही कामाचा समावेश होता. लोकार्पणानंतर तातडीने हे काम होणे अपेक्षित (पान २ वर)

एनएबीएलची अट रद्द करण्याचा घाट

निविदेत सहभाग घेणाऱ्या कंपनीकडे सीबीआरआय, सीपीआरआय किंवा एनएबीएल या केंद्रीय संस्थेकडून सलग काही वर्षांपासूनची मान्यता असणे आवश्यक आहे. दर्जेदार कामासाठी तिसऱ्या निविदेत एनएबीएलचाही समावेश केला गेला. परंतु काही कंत्राटदारांच्या दबावात त्यातील एनएबीएलची अट नव्याने निविदा काढून रद्द केली जाण्याची शक्यता कंत्राटदारांच्या क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.

या कामाच्या निविदेला निश्चितच तांत्रिक कारणाने विलंब होत आहे. तिसऱ्यांदा काढण्यात आलेली निविदा अद्याप उघडलेली नाही. परंतु या निविदेबाबत काही कंत्राटदारांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास मुख्यालयाच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई केली जाईल. तूर्तास सर्व प्रक्रिया नियमानुसारच होत आहे.’’

– अनिल आष्टीकर, मुख्य अभियंता (प्रकल्प), महानिर्मिती, कोराडी.