यवतमाळ : कळंब-बाभूळगाव मार्गावर मजूर घेऊन जात असलेल्या वाहनाने तीन पादचाऱ्यांना जबर धडक दिली. त्यानंतर वाहन पलटले. या अपघातात एक जण ठार, तर २५ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघे गंभीर आहेत. यदु मोतीराम जाधव (५५), रा. नायगाव, ता. बाभूळगाव असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज बुधवारी सकाळी नायगाव (ता. बाभूळगाव) येथे झाला.

चंद्रपूर येथील मजूर पीकअप वाहनाने बुलढाणा येथे जात होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात ममता सुभाष मेश्राम, रमेश सखाराम कांबळे (४५) सुवर्णा विनायक लोनबले (३४), जोस्ना हेमराज हजारे (३०), ममता सुधाकर मेश्राम (३५), सुषमा दिनेश मेश्राम (३५), शालू गुरुदास जराते (३५), हेमराज मनोहर हजारे (३५), विनायक बापूजी लोनवले (३५), डाकराम केवलराम बोरसे (३५), मोरेश्वर कालिदास गेडाम (३५), जयश्री यादव लोनवले (३०), निशा हेमंत मडावी (३०), हे जखमी झाले. सर्व जखमींना यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघे गंभीर आहेत. अपघातात तरुणांची संख्या अधिक आहे. अपघातानंतर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. बाभूळगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या