अमरावती : राज्‍यात शिक्षकांच्‍या पदभरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्‍यासाठी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्‍यता आणि बुद्धिमत्‍ता चाचणी २०२२ ही परीक्षा दिलेल्‍या उमेदवारांना स्‍वप्रमाणपत्र सादर करावे लागत आहे.

१५ सप्‍टेंबरपर्यंत स्‍वप्रमाणपत्र पूर्ण करण्‍याची मुदत देण्‍यात आली आहे. या प्रक्रियेत गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्राच्‍या प्रती पोर्टलवर अपलोड करायच्‍या आहेत. अनेकांकडे गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र नसल्‍याने ते मिळवण्‍यासाठी उमेदवारांची फरफट सुरू आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : कारवाईचा बडगा; वर्षभरात ४८ हजार ६१५ थकबाकीदारांची बत्ती गुल

सुमारे ३० हजार जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्‍यात येणार असल्‍याचा दावा करण्‍यात आल्‍याने टीईटी परीक्षा दिलेल्‍या उमेदवारांचेही अनेक वर्षांपासूनचे शिक्षक होण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण होणार आहे. दरम्‍यान, गुणवत्‍तेनुसार उमेदवारांचे पसंतीक्रम घेण्‍यात येतील. त्‍यानंतर निवड यादी तयार करून नियुक्‍ती दिली जाईल.

हेही वाचा – सत्ताधारी आमदारांना पोसण्यासाठी शासनाच्या तिजोरीतून लूट, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्‍वप्रमाणपत्र सादर करण्‍याच्‍या प्रक्रियेत गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. ज्‍यांच्‍याकडे प्रमाणपत्र नाही, अशांना भरतीच्‍या मुदतीच्‍या आत गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र मिळवून देऊन तोडगा काढावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.