वर्धा : महामार्गावरील गावे म्हणजे अपघाताचे बोलते साक्षीदार म्हणता येईल. असेच नागपूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर कारंजा घाटगे हे तालुक्याचे गाव आहे. गावाने असंख्य अपघात पाहिले. गावातील मृत्यूलापण या अपघातात सामोरे गेलेल्या या गावाची व्यथा कोण ऐकणार, हा प्रश्न आलाय.

कारंजा ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झालेले नाही. गत पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधी नाही तर गावकरीच पाठपुरावा करीत आहे. नागरी समितीने २०२० साली तीन वेळा आरोग्य खात्यास स्मरण करून दिले. शेवटी शिष्टमंडळाने मुंबईत जात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना व्यथा सांगितली. मात्र सर्व ढीम्म कारभार दिसून आला.

हेही वाचा – VIDEO : ताडोबातील ‘या’ वाघिणीच्या बछड्यांनी लावले पर्यटकांना वेड

हेही वाचा – रोहित पवारांचे फडणवीसांना खरमरीत पत्र… एकवेळ जेवणारा, पाठीचा कणा वाकेपर्यंत लायब्ररीत बसणारा सिरीयस कसा नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथील ग्रामीण रुग्णालयात १४ वर्षांपासून पूर्णवेळ अधीक्षकपद रिक्त आहे. परिणामी रुग्णाची जबाबदारी गांभीर्याने घेतल्या जात नाही. ट्रॉमा केअर कक्ष सक्षमतेने चालू नाही. ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी इतर ठिकाणी प्रती नियुक्तीवर असल्याने या ठिकाणी वारंवार गैरहजेरी असते. या अडचणींबाबत शासन व लोकप्रतिनिधी यांची इच्छाशक्ती अजिबात दिसत नसल्याचा आरोप करीत नागरी समितीने आंदोलन छेडले आहे. सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रसंत अनुयायी, युवा संघटना व अन्य संघटनांचे शेकडो स्री पुरुष आता आंदोलनात उतरले आहे.