अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात एका रुग्णाच्या जेवणात चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शिजलेल्या जेवणामध्ये जिवंत अळ्या निघू शकत नसल्याचा दावा करून वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी आरोप फेटाळले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – यवतमाळ : ‘एक्साईज’ विभागाने पहिल्यांदाच केली अशी कारवाई, हातभट्टी दारू विक्रेता स्थानबद्ध

हेही वाचा – अमरावतीत बच्‍चू कडूंच्‍या महत्त्वाकांक्षेला धुमारे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उकर्डा बळीराम मेहरे रा.उगवा हे वॉर्ड क्र. ३१ मध्ये उपचारार्थ दाखल आहेत. शुक्रवारी त्यांना जेवण मिळाले. या आहारामध्ये त्यांना अळ्या दिसून आल्या. मेहरे यांनी याबाबत तक्रार केली. मात्र, येथील कर्मचाऱ्याने जेवण फेकून दिले व दमदाटी केल्याचा आरोप त्यांनी केला. याची माहिती मिळताच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांनी स्वयंपाकगृहाची तपासणी केली. तसेच शिजलेल्या अन्नामध्ये जिवंत अळ्या कशा असू शकतात? अशी शंका उपस्थित केली. या अळ्या नेमक्या अन्नामध्ये कुठून आल्या, याबाबत चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.