नागपूर : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची विशेष पोलीस पथकाच्या(एसआयटी) माध्यमातून करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. त्याचप्रमाणे आंतरधर्मीय विवाहामध्ये तरुणींचा होणारा शारीरिक आणि मानसिक छळ रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. वालकर यांच्या हत्येप्रकरणी लहू कानडे, अबू आझमी, अतुल भातखळकर आदींनी  लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. श्रद्धा वालकरची घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे.  वालकर हत्या प्रकरणानंतर राज्यात ४० हून अधिक मोर्चे निघाले. विविध मोठय़ा १५ हून अधिक संघटनांनी त्यात सहभाग घेतला. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Sunetra pawar, Ajit Pawar,
अजित पवारांनी सपत्निक घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन; सुनेत्रा यांनी देवाला केली ‘ही’ प्रार्थना
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

वालकर हिने तिचा प्रियकर आफताब पुनावाला याच्याकडून मारहाण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती, मग गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी का करण्यात आली नाही. दोन्ही कुटुंबाला बोलावून जे लेखी घेण्यात आले त्याला एक वर्ष उशीर का झाला.  त्या कागदावर तारखेत खाडाखोड करण्यात का आली, असे प्रश्न उपस्थित  करीत आशीष शेलार यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.  त्यावर श्रद्धाने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल पोलिसात तक्रार दिली होती. महिन्याभराने नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. या प्रकरणी कोणाचा दबाव होता का, याची विशेष पथकामार्फत चौकशी केली जाईल. तसेच विधिमंडळाच्या  अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा कार्यवाही अहवाल मांडला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

आंतरधर्मीय विवाहाला कोणाचा विरोध नाही. मात्र, जाणीवपूर्वक एका षडय़ंत्राचा भाग म्हणून असे विवाह काही जिल्ह्यांत होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासंदर्भात काही राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यांचा अभ्यास करून अधिक प्रभावी कायदा करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील महिलांची छेडछाड, अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शक्ती कायदा लागू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. केंद्रीय कायद्याचा अधिक्षेप करून आपण तो कायदा केला आहे. विविध विभागांचे म्हणणे त्यामध्ये विचारात घ्यावे लागते. यासंदर्भात राज्य शासन पाठपुरावा करत असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा निश्चित

नागपूर : समृद्धी महामार्गावरून १५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालवता येणे शक्य असल्याचा अहवाल आयआयटी, मुंबईने दिले होता. परंतु या महामार्गावर अपघातांची मालिका बघता सुरक्षिततेचा उपाय म्हणून या मार्गावर १२० किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ला समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर पहिल्या दिवसापासूनच या मार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. त्यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले होते. ११ डिसेंबरपासून आजवर सहा अपघात झाल्याचे नाना पटोले यांनी सभागृहात सांगितले. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी या महामार्गाचा आराखडा आणि जाडी तांत्रिकदृष्टय़ा योग्य आहे. आयआयटी मुंबईने तर यावर १५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालवता येईल, म्हटले आहे. परंतु आपण त्यावर १२० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा निश्चित केली आहे. तसेच समृद्धी मार्गावर गस्त घालणारी वाहनांची संख्या वाढवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.