वर्धा : शेतजमिनीचा ताबा वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसातील वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये सौख्य वाढीस लागण्यासाठी शासनाने सलोखा योजना सुरू केली आहे. बरेचदा एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असतो. अशावेळी वाद उद्भवण्याची शक्यता जास्त असते. अशी प्रकरणे सामंजस्याने अदलाबदल होणे आवश्यक असते. यासाठीच ही योजना शासनाने याचवर्षी जानेवारीमध्ये सुरू केली आहे.

या सलोखा योजनेंतर्गत आष्टी तालुक्यात एका प्रकरणात कार्यवाही पूर्ण करण्यात आली. यामध्ये मौजा बोरगाव येथील सुनील कडू यांचे शेत आणि प्रभाकर कडू यांचे शेत अदलबदली करायचे होते. याकरिता दोघांची कागदपत्रे जमा करण्यात आली. अदलाबदलीचा लेख नोंदणी करण्यात आला व त्याच दिवशी फेरफार नोंदवण्यात आला.

हेही वाचा – अमरावती : मेळघाटात दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेरफारची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित दोन्ही शेतकऱ्यांच्या सातबाराला त्याचा अंमल देण्यात आला. दोघेही संबंधित शेतकरी यांना त्यांचा सुधारित सातबारा वाटप करण्यात आला. सलोखा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ही पहिलीच कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. असा हा आष्टी तालुक्याचा जिल्ह्यातील पहिलाच दाखला आहे.