बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. सौर कुंपण असतानाही बाहेरच्या बिबट्याने आत शिरुन प्राणीसंग्रहालयातील काळविटाची शिकार केली. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी सौर कुंपण असतानाही बिबट्याने आत शिरुन नऊ हरिणांची शिकार केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

या प्राणीसंग्रहालयात सुमारे ४० हेक्टरवर तृणभक्षी प्राण्यांची सफारी आहे. येथे हरिण, काळविट, पांढरे काळवीट तसेच इतर तृणभक्षी प्राणी आहेत. गोरेवाडा परिसरातच बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बचाव केंद्रातील प्रकारानंतर प्राणीसंग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी येथे सौर कुंपण करण्यात आले आहे. मात्र, आता या सौर कुंपणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्राणीसंग्रहालयातल्या बिबट सफारीतील बिबट नाहीसे होण्याचे प्रकार येथे दोनदा घडून आले. त्यावेळीही प्राणी संग्रहालयाच्या अभिरक्षकांना विचारले असता बिबट्याला बाहेरची शिकार मिळाल्यास ते आठ-आठ दिवस परत येत नाहीत, असे उत्तर दिले.

हेही वाचा : तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करा ; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

या प्राणी संग्रहालयात सातत्याने काही ना काही घटना घडतच असल्याने वन्यप्राण्यांची सुरक्षिता धोक्यात आली आहे. प्राणीसंग्रहालयाचे अभिरक्षक तसेच प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापन खरोखरच प्राण्यांच्या सुरक्षितेबाबत गंभीर आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय अभिरक्षक दीपक सावंत म्हणाले, की बिबट आत घुसल्याची घटना घडली असून आम्ही त्यावर काम करत आहोत. पावसामुळे सौर कुंपणातील वेगवेगळ्या झोनपैकी एका झोनमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या आहेत. वन्यप्राण्यांच्या सुरक्षितेबाबत आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard entered the zoo and kill antelope in balasaheb thackeray of international gorewada zoo nagpur tmb 01
First published on: 12-10-2022 at 10:37 IST