लोकसत्ता टीम

चंद्रपूर : शहरातील बिंनबा गेट परिसरातील एका मोकळ्या जागी वाढलेल्या झुडपात बिबट्या आल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग, पोलिस विभाग तथा इको प्रो या वन्य जीव संघटनेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

चंद्रपूर शहर व लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल विकसित झाले आहे. त्यामुळे शहरात वाघ , बिबट्या तथा अस्वल, नीलगाय, सांबार, हरीण यासारखे वन्यप्राणी सातत्याने येत असतात. गुरुवारी पहाटेच्या सुमारास अशाच प्रकारे बिबट्याने प्रवेश केला. इरई नदी पात्राच्या मार्गाने हा बिबट्या चंद्रपूर शहरात पहाटे तीन वाजता दाखल आल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रपुरात बिबट्या येताच त्याला काही जणांनी बघितले. त्यानंतर हा बिबट्या पंचशील प्रभागात देखील अनेकांना दिसला. तिथून बिबट्या बिनबा गेट परिसरातील डॉ. दीक्षित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल समोरील एका मोकळ्या प्लॉटचे झाडीत गेला तिथेच तो आता लपून बसलेला आहे.

आणखी वाचा-गडचिरोली : चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची १५ किमी पायपीट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्या शहरात आल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी परल्याने बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी चंद्रपूर वन विभाग, चंद्रपूर पोलिस तथा इको प्रो या स्वयंसेवी संस्थांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मात्र बिबट्या लोकांच्या भीतीने झुडपातून बाहेर पडत नसल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागत आहे. बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्याचे देखील प्रयत्न केले जात आहे. मात्र काही केल्या बिबट्या बाहेर येत नसल्याने बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान एकीकडे लोकांची गर्दी व दुसरीकडे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत.