महेश बोकडे

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) राज्यभरात बसस्थानक स्वच्छ व सुंदर मोहीम लोकसहभागातून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या संकल्पनेतील या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी व विविध संघटनांचा चांगला प्रतिसाद असला तरी स्थानिक स्वराज्य संस्था मात्र मोहिमेपासून दूर आहे.

uday samant buldhana marathi news
“महायुती बुलढाण्यासह राज्यात ४५ जागा जिंकणार”, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा; तुपकरांवर टीकास्त्र
sawantwadi dodamarg wildlife corridor marathi news
मुंबई: सावंतवाडी दोडामार्ग परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करा, उच्च न्यायालयाचे केंद्र व राज्य सरकारला आदेश
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
An appeal to complain to district administration if If not given leave for voting
मतदानाला सुट्टी न देणे महागात पडणार

शिंदे यांनी बैठकीत दिलेल्या निर्देशानंतर एसटी महामंडळाने प्रथमच राज्यात एसटीचे बसस्थानक स्वच्छ, सुंदर करण्यासाठी लोकसहभाग वाढवून मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील सगळय़ाच बसस्थानक प्रशासनाने स्थानिक महापालिका, नगरपालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्था, महाविद्यालय, विविध स्वयंसेवी संस्थांना पत्र देत या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. मोहिमेला नागपूरसह राज्यभरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विविध संस्थांकडून चांगला प्रतिसाद असून ते स्वच्छतेसह बसस्थानक सुंदर करण्यासाठी कामही करत आहे.

हेही वाचा >>>नागपूर लोकसभा: पहिल्या दिवशी पहिला अर्ज, कोणाचा?

परंतु, मुख्यमंत्र्यांनी मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्थांना सहभागी करण्यास सांगितल्यावरही मनुष्यबळ नसल्यासह इतर कारणे देत स्थानिक स्वराज्य संस्था या अभियानातून पळ काढत आहे. हे चित्र नागपूरसह सर्वत्र असल्याचे एसटीचे अधिकारी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगतात.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाचे एसटी बसस्थानक स्वच्छ व सुंदर करण्याची इच्छा नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोहिमेतील कामे

मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, महाविद्यालयातील एन.सी.सी., एन.एस.एस., विद्यार्थी व लोकांचा सहभाग वाढवायचा आहे. या सगळय़ांच्या मदतीने बसस्थानक परिसरातील  मातीचे ढिगारे, अनावश्यक झाडे-झुडपे, दीर्घकाळ साचलेला कचरा, स्थानकावरील छत, पंखे यावर साचलेली जळमटे, स्थानकावरील बैठक व्यवस्था, फरशी, भिंतीचे कोपरे, फिनेल, अ‍ॅसिड टाकून ब्रशने धुवून स्वच्छ करणे, एसटीच्या चालक, वाहकासह इतर कर्मचाऱ्यांचेही विश्रांतीगृह, प्रसाधनगृहाची स्वच्छता करायचे आहे.

बसस्थानक स्वच्छ व सुंदर मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विविध स्वयंसेवी संस्थांचा चांगला प्रतिसाद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तूर्तास मनुष्यबळाची समस्या असली तरी ते ही लवकर सहभागी होण्याची आशा आहे.- श्रीकांत गभणे, उपमहाव्यवस्थापक, एसटी महामंडळ, नागपूर.