नागपूर : असे अनेक अभ्यासक्रम आहेत की, ते पूर्ण केल्यानंतर नोकरीची किंवा स्वत:चा व्यवसाय करण्याची संधी मिळते. त्यामुळे हिंमत न हारता आणि चिंता न करता पुन्हा एकदा नव्या दमाने सुरुवात करायला हवी, असे मत शिक्षणतज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.

दहावीनंतर कॉम्प्युटरचे अनेक कोर्स उपलब्ध आहेत. त्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक खासगी संस्था कार्यरत आहेत. यात कॉम्प्युटर मेंटेनन्स, व्हिडीओ एडिटिंग, डिझाइन, एचटीएमएल, मोबाईल दुरुस्ती कोर्स, नेटवर्किंग आणि हार्डवेअर आदी कोर्सचा समावेश.

हेही वाचा – यूपीएससी पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर; ‘या’ डायरेक्ट लिंकवरून लगेच चेक करा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय वायरमन, प्लंबर ऑफ अप्लायन्सेस, टीव्ही रिपेअरिंग, नर्सरी डेव्हलपमेंट, कमर्शियल आर्टिस्ट, पोल्ट्री मॅनेजमेंट, टाइल लेअर, कारपेंटर, ब्रीक लेअर, पेस्ट कंट्रोल, पॅकिंग, किचन गार्डनिंग, सेक्रेटरियल प्रॅक्टिस, पब्लिक स्पीकिंग, फ्लॉवर मेकिंग आदी अभ्यासक्रम करता येतील. त्यामुळे आता दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी चिंता न करता या नव्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा.