लोकसत्ता टीम

नागपूर : एसटीच्या राज्यभरातील ताफ्यात आकर्षक ‘लक्झरी स्लिपर कोच’ दाखल झाल्या आहेत. नागपूरच्या गणेशपेठ आगारातही सहा ‘लक्झरी शयनयान’ आज (शुक्रवारी) पोहोचणार असून, सोमवारपासून त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल

नागपूर- पुणे मार्गावर खासगी बसला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. जवळपास सर्वच ट्रॅव्हल्समध्ये रोज प्रवासी गर्दी करत असल्याने ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारून लूट करत असतात. दिवाळीचा सन जवळ असल्याने या काळात हा प्रकार जास्त होतो. हा सर्व प्रकार लक्षात घेऊन एसटीने या ३० सिटर स्लिपर कोच प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. या गाडीला पुणे प्रवास भाडे १६०० रुपये असेल.

आणखी वाचा-चंद्रपूर: डॉक्टरांकडून शिंदे गटाचे खासदार पाटलांचा कॅन्डल मोर्चा काढत निषेध

नागपुरातील गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक गौतम शेंडे म्हणाले, प्रवाशांना लक्झरीचा फिल देणाऱ्या या सहा नव्या कोच्या बसेस नागपूर- पुणे मार्गावर चालविल्या जातील. सोमवारपासून त्या प्रवाशांना सेवा देतील. गणेशपेठ आगाराला एसटी महामंडळाने रोज तीन फेऱ्यांसाठी दुपारी ३, सायंकाळी ५ आणि ६ वाजता या गाड्या चालविण्याची मंजुरी दिली आहे. मात्र, सुरुवातीला काही दिवस रोज दोनच फेऱ्या चालतील. प्रवाशांची मागणी आणि प्रतिसाद लक्षात घेऊन तिसरी फेरी सुरू केली जाईल. या बसला नागपूर ते पुणे दरम्यान कोंढाळी, तळेगाव, कारंजा, अमरावती, चिखली, औरंगाबादसह एकूण १४ थांबे राहणार असल्याचेही शेंडे म्हणाले.