चंद्रपूर: नगर विकास विभागाने राज्यातील ड वर्ग महापालिकांना प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. निर्देश नव्याने दिले असले तरी प्रभाग रचना जुनीच म्हणजे एका प्रभागात किमान तीन आणि कमाल पाच नगरसेवक असतील. चंद्रपूर महापालिकेचा विचार केला तर एका प्रभागात चार नगरसेवक राहणार आहेत. तर उर्वरीत दोन किंवा एका प्रभागात तीन किंवा पाच नगरसेवक असतील. जुन्या लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना केली जाणार असून नगरसेवकांची संख्या ६६ इतकीच राहिल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर आता निवडणुकीच्या हालचालीना वेग आला आहे. मागील तीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र नगरविकास मंत्रालयाच्या प्रभाग रचनेच्या निर्देशानंतल हालचाली वाढल्या आहेत. चंद्रपूर महापालिका ड वर्गात येत असल्याने महापालिका आयुक्त विपिन पालिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसे आदेश प्राप्त झाले असल्याची माहिती दिली. प्रारुप प्रभाग रचना मनपा आयुक्त तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहे. तर जिल्हाधिकारी मान्यतेसाठी राज्य निवडणुक आयोगाकडे पाठविले. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आक्षेप, हरकती मागविल्या जातील आणि अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. प्रभाग रचना लगतच्या जनणगेच्या लोकसंख्येच्या आधारे केली जाणार आहे.

त्यामुळे सन २०११ च्या जणनगणेच्या आधारावर प्रभार रचना होईल. गतवेळी या लोकसंख्येत सरासरा १५ टक्क्यांच्या वाढ केली होती. त्यामुळे चंद्रपूर शहरात प्रभागांची आणि नगरसेवकांची संख्या वाढली. परंतु प्रभाग रचना करताना संबंधित क्षेत्रातील मतदार संख्या अथवा सध्याची रहिवासी संख्या विचारता घेतली जाणार नाही. जुन्या जनगणेच्या आधारावर पालिका सदस्यांची संख्या ठरणार आहे. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेत प्रभागाची आणि नगरसेवकांची संख्या वाढणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मागील निवडणुकीत चंद्रपूर महागनर पालिकेत सतरा प्रभाग होते. नगरसेवकांची संख्या ६६ होती. यात भाजप ३६, कॉग्रेस १२, बसपा ८, अपक्ष ४, शिवसेना २ आणि मनसेचे दोन तर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे २ नगरसेवक होते. नव्या रचनेत एका प्रभागत चार सदस्य असतील. प्रभागाची रचना लहान असले तर तीन आणि मोठी असेल तर पाच नगरसेवक असतील. त्यामुळे कमी नगरसेवकांची प्रभाग तयार होणार नाही. दरम्यान प्रभाग रचनेचे आदेश येवून धडकताच विविध राजकीय पक्षांचे माजी नगरसेवक सक्रीय झाले आहेत. माजी नगरसेवकांच्या सक्रीयतेमुळे आता निवडणुकीचे वातावरण तयार होण्यास सुरूवात होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभाग रचना प्रारूप तयार करण्याचे आदेश आले आहेत. लवकरच प्रभाग रचना तयार करण्याचे कामाला सुरूवात होईल. प्रारूप कधीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवायचे ही तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे प्रारूप तयार करण्याचे कामाला सुरूवात करू – विपिन पालिवाल,आयुक्त, चंद्रपूर महापालिका