गोंदिया : राज्याच्या राजकारणात रविवार २ जुलै पासून सत्तासंघर्षचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. एकीकडे अजित  पवार व प्रफुल्ल पटेल तर दुसरीकडे  राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढारी व कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल व अजित पवार यांना खुले समर्थन दिले आहे. एवढेच नव्हेतर ५ जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या दोन्ही गटाच्या सक्ती प्रदर्शन बैठकीत गोंदिया जिल्ह्याच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एमईटी सभागृहात हजेरी लावून अजित पवार,प्रफुल्ल पटेल यांना समर्थन दिले. या घडामोडीला जवळपास ३ ते ४ दिवसांचा काळ लोटत चालला असून पण गोंदिया जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झेंडा उचलण्यासाठी कोणतेही हात समोर येतांना दिसून येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या गट जिल्ह्यात अप्रभावशील दिसून येत आहे.

हेही वाचा >>> पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे रविवारपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर

भंडारा जिल्ह्यात माजी जि. प. सदस्य किरण आतकरी यांच्या माध्यमातून प्रयत्न झाले आणि भंडाऱ्यात शरद पवार गटाचा झेंडा उचलणारे तर मिळाले पण गोंदिया जिल्ह्यात शरद पवार गटाची पाटी आज पर्यंत कोरीच आहे.  भंडारा तून किरण आतकरी नी गोंदिया जिल्ह्यात प्रयत्न केले पण स्थानिक राजकीय दबावापोटी त्यांना यात अपयशच आले. सध्या तर गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुढारी व कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच सभ्रम निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादीची एकता कायम राहणार की फुट पडणार ? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र ५ जुलै रोजी खा. प्रफुल्ल पटेल व अजीत  पवार तर दुसरीकडे खा. शरद पवार या दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसची सक्ती प्रदर्शन बैठक बोलविण्यात आली होती. यामुळे राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये उभी फुट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले. दरम्यान सभ्रमात सापडलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुढारी व कार्यकर्त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. जिथे प्रफुल्ल पटेल तिथे आम्ही या भूमिकेतून अजीत  पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला समर्थन जाहीर केले.

हेही वाचा >>> “अमोल मिटकरी, तुमच्या रक्तातील पुरोगामी विचार रेशीमबागेत गहाण ठेवून…”, सामाजिक कार्यकर्त्याचे परखड पत्र व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐवढेच नव्हेतर ५ जुलै रोजी झालेल्या सक्ती प्रदर्शनातही हजारोच्या संख्येत हजेरी लावून आपले समर्थन जाहीर केले. या घडामोडीला ६ दिवसाचा काळ लोटूनही गोंदिया जिल्ह्यात खा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे नेतृत्व करण्यासाठी एकही हात उभे झाले नाही. किंबहुना एकाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने शरद पवार यांच्या गटाला पाठिंबा दर्शविला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी कांग्रेसचा झेंडा कोण उचलणार ? अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  मुंबई बैठकीतून आल्यानंतर अजित पवार ,प्रफुल पटेल गटाकडून मिळालेल्या आदेशानुसार जिल्ह्यातून ३ हजार शपथपत्र भरून देण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस चे गोंदिया जिल्हाध्यक्ष गंगाधर परशूरामकर यांनी दिली आहे.