अमरावती : Maharashtra Amravati Division SSC 10th Result 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९२.९५ टक्के लागला आहे.

नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९५.५८ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात पाचव्या स्थानी होता. यावेळी क्रमवारीत सहाव्‍या स्थानी घसरण झाली असून निकालात २.६३ टक्‍क्‍यांची घट झाली आहे.

अमरावती विभागातून एकूण १ लाख ६० हजार ६६४ विद्यार्थ्‍यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्‍यक्ष परीक्षेला १ लाख ५८ हजार ९३१ विद्यार्थी प्रविष्‍ट झाले. त्‍यापैकी १ लाख ४७ हजार ७३९ विद्यार्थी  उत्‍तीर्ण झाले. अमरावती विभागाची उत्‍तीर्णतेची टक्‍केवारी ही ९२.९५ आहे.

विभागात निकालाच्‍या टक्‍केवारीत बुलढाणा जिल्‍हा अव्‍वलस्‍थानी आहे. बुलढाणा जिल्‍ह्याचा निकाल ९५.५२ टक्‍के इतका आहे. क्रमवारी नुसार दुसरे स्‍थान वाशीम ९५.४१ टक्‍के, अमरावती ९२.८६ टक्‍के, यवतमाळ ९१.५१ आणि अकोला जिल्‍ह्याचा निकाल सर्वात कमी म्‍हणजे ८९.३५ टक्‍के लागला आहे.

मुलींचाच वरचष्‍मा

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात मुलांपेक्षा सरस असल्‍याचे दाखवून दिले आहे. मुलींच्‍या उत्‍तीर्णतेची टक्‍केवारी ही ९५.४० टक्‍के तर मुलांची ९०.८२ टक्‍के आहे. विभागातून ८४ हजार ८३९ मुलांनी परीक्षा दिली होती, त्‍यापैकी ७७ हजार ५२ मुले, तर ७४ हजार ९२ मुलींपैकी ७० हजार ६८७ मुली उत्‍तीर्ण झाल्‍या.

प्रावीण्‍यप्राप्‍त विद्यार्थी सर्वाधिक

अमरावती विभागात उत्‍तीर्ण झालेल्‍या परीक्षार्थ्‍यांपैकी प्रावीण्‍यासह प्रथम श्रेणी म्‍हणजे ७५ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्‍यांची संख्‍या ४८ हजार ५३० इतकी आहे.  प्रथम श्रेणी म्हणज ६० टक्क्यांच्या पुढे  गुण मिळवणारे ४८ हजार ७७४ विद्यार्थी आहेत. द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३९ हजार ५०९ आणि ३५ टक्क्यांच्या वर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १० हजार ९२६ इतकी आहे.

परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होऊन इयत्ता अकरावीचे वर्ग लवकर सुरू व्हावेत, यासाठी तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेण्याच्या दृष्टीने यावर्षी प्रथमच इयत्ता दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर आयोजित करण्यात आली होती. गेल्या वर्षीप्रमाणेच पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली होती.

जिल्‍हानिहाय निकाल

बुलढाणा – ९५.५२ टक्‍के

वाशीम – ९५.४१ टक्‍के

अमरावती – ९२.८६ टक्‍के

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यवतमाळ – ९१.५१ टक्‍के अकोला – ८९.३५ टक्‍के