मूल्यांकनाबाबत शिक्षण मंडळासमोर अडचणी

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर व अमरावती विभाग कार्यालयात पूर्णकालीन अध्यक्ष व सचिव नसल्यामुळे  या दोन्ही कार्यालयाचे काम प्रभारींच्या भरवशावर चालत आहे. यंदा परीक्षा न झाल्याने मूल्यांकनाच्या प्रक्रियेतही बदल झाला आहे. असे असतानाही पूर्णवेळ अध्यक्ष व सचिव नसल्याने शिक्षण मंडळासमोर अडचण निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इयत्ता नववीचे पन्नास टक्के गुण, इयत्ता दहावीतील अंतर्गत मूल्यमापन तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षांच्या गृहपाठाच्या आधारावर ५० टक्के गुण, अशा एकत्र गुणांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून दहाव्या वर्गाचा निकाल लावण्याचे नियोजन शासनाने केले आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर या निकालाची आणि परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे. मात्र, नागपूर आणि अमरावती शिक्षण मंडळाच्या कार्यालयात अनेक वर्षांपासून पूर्णकालीन अध्यक्ष व सचिव  नाही.  त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि मूल्यांकनावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप महाराष्ट्र शिक्षण परिषदेने केला आहे.  नागपूर विभागाच्या अध्यक्षपदाचा प्रभार तत्कालीन अध्यक्ष चंद्रमणी बोरकर यांच्याकडे होता. त्यांची पदोन्नती झाल्यानंतर संजय गणोरकर हे प्रभारी होते. त्यानंतर अनिल पारधी,  रविकांत देशपांडे हे प्रभारी होते. त्यानंतर पुन्हा अनिल पारधी  प्रभारी झाले आणि आता हा कार्यभार नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांच्याकडे  आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state board of secondary higher secondary education nagpur and amravati divisional office akp
First published on: 16-06-2021 at 00:14 IST