नागपूर: स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑप बँक ली.मध्ये (एसटी बँक) करोना काळात मोठा गैरव्यवहार झाला आहे. या दोन वर्षांतील समवर्ती तपासणी (काँक्रंट ऑडिट) योग्य पद्धतीने झाले नाही. सहकार खात्याकडून त्याची चौकशी सुरू आहे, असा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला.

एसटी बँक निवडणुकीच्या निमित्ताने अध्यापक हॉल, नागपूर येथे सोमवारी झालेल्या महारष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बरगे पुढे म्हणाले, एसटी बँक व सभासदासमोर अनेक अडचणी असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सध्या मुद्दे माहिती नसलेले लोक या बँकेत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे. या बँक निवडणुकीत मुख्य मुद्द्यांना बगल दिली जात आहे.

हेही वाचा >>> ‘लालपरी’ची कोट्यवधींची ‘उड्डाणे’! मे महिन्यात बुलढाणा विभागाला ‘इतक्या’ कोटींचा नफा

बँकेच्या उभारणीत किंवा जडणघडणीत संबंध नसलेले व्यक्ती राजकीय नेत्यांचे फोटो लावून त्यांच्या नावे बँक निवडणुकीत मते मागत आहे. कर्मचाऱ्याच्या हितासाठी स्थापन या बँकेचे ७० हजार सभासद असून बँकेची ४ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आहे. करोना काळात बँकेचे अंकेक्षण झाले नाही. त्यामुळे शाखानिहाय लेखापरिक्षक नेमले गेले. त्यांनी दोन वर्षाचे ऑडिट एक -दोन दिवसात करून टाकले. यासाठी एका शाखेकडून ८० हजार रुपये तपासणी करणाऱ्यांना दिले गेले.

हेही वाचा >>> भाजप प्रवेशानंतर माफी मागत आशीष देशमुखांची प्रतिक्रिया म्हणाले, “सुबह का भुला श्यामको…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संपूर्ण अंकेक्षणासाठी बँकेकडून ६५ लाख रुपये संबंधितांना दिले गेले. या उधळपट्टीत गैरव्यवहार झाल्याचा आरोपही बरगे यांनी केला. त्यांनी सनावर्ती तपासनी प्रकरणाची चौकशी सहकार खात्याकडून न करता पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याची मागणी केली. बँकेच्या ५० शाखा व ११ विस्तार केंद्र आहेत. त्यामुळे गरज नसलेल्या शाखा व विस्तार केंद्र बंद केली  पाहिजेत. सभासदांनी  कर्ज घेतल्यावर त्यावर जे व्याज लावले जाते ते कमी करण्यासाठी प्रशासकीय खर्च कमी करणे गरजेचे असल्याचेही बरगे यांनी सांगितले.