लोकसत्ता टीम

वर्धा : कुंडलीतील दहावा ग्रह म्हणून जावई संबोधला जातो. करावे तितके कमीच. पण असे स्थान असूनही येथील कृष्ण नगर भागात राहणाऱ्या निर्मला नारायण ताकसांडे यांना विपरीत अनुभव आला. त्या इतरत्र घरकाम करून घरी परतल्या तेव्हा जावई धीरज भीमराव जयपूरे घरी बसून दिसला. त्याच्या हातातील पिशव्यात काय आहे अशी विचारणा केल्यावर त्याने धक्का देत पळ काढला.

घरात जात पाहणी केल्यावर सामान विखुरलेले दिसले. एका खास पेटीची पाहणी केल्यावर सोन्याची अंगठी, पोत,चेन असे ४२ हजार रुपये किमतीचे दागिने आढळले नाही. निर्मला यांनी जावयास फोन करून घरी बोलावले. पण तो आलाच नाही.

आणखी वाचा-पावसाच्या तडाख्यात महावितरणला ४५ लाखांचा फटका; अडीचशे मीटरमध्ये पाणी अन..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी संशय बळवल्याने त्यांनी रामनगर पोलीसांकडे तक्रार केली. आता पोलीस या भामटी जावयाच्या शोधात आहे. त्याने घरातील काही कागदपत्रेही चोरून नेल्याची शंका व्यक्त झाली.