चंद्रपूर:पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा सेल्लुर या गावाशेजारी असलेल्या जंगलाला आज मंगळवारी सायंकाळी ७ वाजता भिषण आग लागल्याने शेकडो हेक्टर जंगल जळुन खाक झाले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा सेल्लुर गावाला लागुन जंगल आहे त्या जंगलात प्राण्यांचे वास्तव्य असुन याच जंगलाला आता भिषण आग लागली आहे.आगीची तिव्रता एवढी भिषण होती कि काही वेळातच त्या आगीने रौद्ररूप धारण केले आणी शेकडो हेक्टर जंगल जळुन खाक झाले आहे. या आगीला वेळीच आटोक्यात आणली गेली नाही तर वेळवा सेल्लुर या गावांना धोका निर्माण होऊ शकतो यासाठी वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे. आगीत शेतकऱ्यांच्या तणीस चे ढिगारे जळयला लागले असुन आणखी नुकसान झाल्याची माहिती आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2022 रोजी प्रकाशित
वेळवा जंगलात आग
आगीत शेतकऱ्यांच्या तणीस चे ढिगारे जळयला लागले असुन आणखी नुकसान झाल्याची माहिती आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-05-2022 at 20:51 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive forest fire breaks out in pombhurna taluka zws