बुलढाणा : येथील सोळंके लेआउटमध्ये एका घराला आग लागून एक वृद्ध गंभीररित्या होरपळल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. यावेळी अग्निशमन दलासह घटनास्थळी आलेले आमदार संजय गायकवाड यांनी पाण्याचा मारा करीत आग विझविण्यासाठी नागरीकांच्या खांद्याला खांदा लावून शर्थीचे प्रयत्न केले.

सोळंकी ले आऊटमध्ये गजानन अंबादास बांबल राहतात. ते सहपरिवार लग्नानिमित्त परगावी गेले होते. घरी त्यांचे वडील निवृत्त मुख्याध्यापक अंबादास बांबल हेच होते. रात्री दहाच्या सुमारास कुडाच्या टीनशेडने पेट घेतल्यावर दोन दुचाकींनी पेट घेतल्याने स्फोट झाला. वाहनातील पेट्रोलने भडका घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत अंबादास बांबल गंभीररित्या भाजले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरती करण्यात आले आहे.

व्हिडीओ – लोकसत्ता टीम

हेही वाचा – अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९३.२२ टक्‍के; राज्यात सहावे स्‍थान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रारंभी परिसरवासियांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका लग्नाहून बुलढाणा येथे परतणारे आमदार संजय गायकवाड यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी पालिकेचे अग्निशमन दल सोबत घेत घटनास्थळ गाठले. त्यांनी पाण्याचा मारा करीत आग विझविण्यात हातभार लावला. अग्निशमन व नागरिकांच्या संयुक्त परिश्रमामुळे ही आग रात्री अकराच्या सुमारास आटोक्यात आली. यात बांबल यांचे मोठे नुकसान झाले आहे.