उपराजधानीत नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीला संचालित करणारी मुख्य सूत्रधार विभूती यादव (रा. शिवणी, मध्यप्रदेश) हिला मानवी तस्करी विरोधी पथकाने (एएचटीयू) अटक केली. न्यायालयाने तिला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उपराजधानीत नवजात बाळांची विक्री करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती, हे विशेष.

उपराजधानीतील काही रुग्णालयात डॉक्टर्स, परिचारिका आणि अनाथाश्रमाच्या माध्यमातून नवजात बाळांची परराज्यात विक्री करणाऱ्या काही टोळ्या कार्यरत आहेत. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या एएचटीयू पथकाने छापेमारी करीत टोळ्या उघडकीस आणल्या. तपास अधिकारी रेखा संकपाळ यांनी बोगस डॉक्टर विलास भोयर, राहुल ऊर्फ मोरेश्वर दाजीबा निमजे आणि नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत (शांतीनगर) आणि मोनाली खवास यांना अटक केली होती. २८ जानेवारीला गर्भवती तरुणी मोनाली ही डॉ. विलास भोयरच्या रुग्णालयात आली होती. तिला ७ लाखांत बाळ विक्री करण्याची योजना आखली. मोनालीने ३ फेब्रुवारीला बाळाला जन्म दिला. त्यानंतर टोळीची सूत्रधार विभूती यादव, नरेश राऊत, राहुल निमजे आणि डॉ. भोयर यांनी तेलंगणातील प्राध्यापक दाम्पत्याला ७ लाखांत विकले. लोकसत्ताच्या वृत्तानंतर एएचटीयू पथकाने तीन आरोपींना अटक केली. तर टोळीची मुख्य सदस्य विभूती यादव ही फरार झाली होती. विभूती ही कोलकाता, गोवा, उत्तरप्रदेश बिहार या राज्यात फिरत होती. पोलिसांनी शुक्रवारी मोठ्या शिताफीने विभूतीला सापळा रचून अटक केली. तिने बाळ विक्री केल्याच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, डॉ. अक्षय शिंदे, रोशन पंडित, मंदा मनगटे, मानवी तस्करी प्रतिबंधक पथकातील तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ, हवालदार सुनील वाकडे, चालक मंगेश बोरकुटे आणि प्रफुल्ल वाघमारे यांनी कारवाई केली.

Electricity Contract Workers, maharashtra, Promised Age Relaxation, Permanent Jobs, Yet to Be Fulfilled, nagpur, electricity workers, marathi news, devendra fadnavis,
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

डॉक्टर, परिचारिका रडारवर

नागपुरातील धरमपेठ, शांतीनगर, लकडगंज, सदर, गिट्टीखदान आणि धंतोली परिसरातील काही रुग्णालयाशी नवजात बाळ विक्री करणाऱ्या साटेलोटे आहे. येथील रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका पोलिसांच्या रडारवर आहेत. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळांचा सौदा रुग्णालय केल्या जातो. नवजात बाळ खरेदी करणाऱ्या दाम्पत्याच्या नावावर जन्माची नोंद केल्या जाते. त्यासाठी रुग्णालय १ ते ३ लाख रुपये घेतल्याची माहिती आहे.

बाळ खरेदी करणारे दाम्पत्यही अडकणार

तेलंगनातील प्राध्यापक दाम्पत्याने ७ लाख रुपयांमध्ये नवजात बाळ खरेदी केले होते. त्यामुळे अवैधरित्या बाळाच्या खरेदी-विक्रीत गुंतलेल्या प्राध्यापक दाम्पत्यावरही पोलीस कारवाई करणार आहेत. आरोपींशी पैशाचा व्यवहार केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे तेलंगणातील दाम्पत्यालाही पोलीस ताब्यात घेणार आहेत, अशी माहिती आहे.