चंद्रपूर : श्री महाकाली यात्रा महोत्सव ट्रस्टच्यावतीने १९ ते २३ ऑक्टोबरपर्यंत श्री माता महाकाली यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सलग पाच दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रपरिषदेत दिली.

महोत्सवाची सुरुवात १९ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता जैन मंदिर संस्था व सराफा असोसिएशनच्यावतीने श्री माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीच्या शोभायात्रेने होणार आहे, तर रात्री आठ वाजता जगप्रसिद्ध गायक लखबीरसिंग लख्खा यांचा देवी गीत जागरणाचा कार्यक्रम होईल. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता सारेगामा फेम निरंजन बोबडे प्रस्तुत गायन व नृत्यातून ईश्वराच्या विविध रुपांचे दर्शन घडवणारा कार्यक्रम आहे. यामध्ये १७१ कलावंत सहभागी होणार आहेत. २१ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर आधारित नाट्य सादर केले जाणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली सामंत यांच्या गीतांचा कार्यक्रम आहे. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता युवा कीर्तनकार सापानदादा कनेरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर सुप्रिसद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिमय संगिताचा कार्यक्रम आयोजित आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : ओबीसींच्या भविष्यासाठी भेटी गाठी जनजागृती अभियान राबविणार

हेही वाचा – वर्धा : धक्कादायक! पतीने पत्नीला दगडाने ठेचले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व कार्यक्रमांसाठी महाकाली मंदिर लगतच्या मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात आलेला आहे. तसेच २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता महाकाली मंदिर परिसरातून भव्य पालखी नगर प्रदक्षिणा निघणार आहे. यात लेझिम पथकासह भजन मंडळ, हनुमानसेना, उत्तर प्रदेशातील कालीमाता नृत्यू तसेच विविध कलापथक सहभागी होणार आहेत. पालखी सोहळ्यात सुप्रसिद्ध गायिका इशरत जहां यांचा रोड शो आहे. या महोत्सवात लाखो भाविक सहभागी होतील, अशी माहिती आमदार जोरगेवार यांनी दिली.