बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. या कुत्र्याने अनेकांना चावा घेतल्याने शहरवासीयांत भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रामुख्याने चिखली शहरातील आठवडी बाजार, तहसील कार्यालय परिसर आणि राऊतवाडी परिसरात या कुत्र्याने तब्बल ३० नागरिकांना चावा घेतला. तहसिल कार्यालय, आठवडी बाजार हे सार्वजनिकपरिसर दिवसभर गजबजलेले राहतात.यामुळे या पिसाळलेल्या कुत्र्याचा धोका जास्तच वाढला आहे. सध्या अधून मधून असणारे ढगाळ वातावरण कुत्र्याने दंश केलेल्या रुग्णांसाठी जास्त धोकादायक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे शहरभर खळबळ माजली आहे.

हेही वाचा…“वरिष्ठांचा निर्णय अंतिम, पण पालकमंत्री जिल्ह्यातीलच हवा”, महायुतीच्या नेत्यांची भावना

प्राप्त माहितीनुसार चिखली येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कुत्र्याने चावा घेतलेल्या पिडीत रुग्णांवर उपचार सुरू आहे. मात्र यातील आठ ते नऊ रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. चिखलीमध्ये या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा…विद्यार्थ्यांसाठी ‘ रंगोत्सव ‘ तर शिक्षकांसाठी ‘ समृद्धी ‘ उपक्रम. प्रवासभत्ता, भोजन, निवास मोफत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विषेश पथक गठीत

चिखली नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत बिडगर यांना याची माहिती मिळताच त्यांनी गंभीर दखल घेतली.तसेच या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची विशेष चमू तयार केली आहे. हे विशेष पथक राऊत वाडी, आठवडी बाजार, चिखली तहसिल कार्यालय परिसरात त्या कुत्र्याचा शोध घेत आहे.हजारो चिखली शहर वासीयांना या कुत्र्याने सळो की पळो करून सोडले आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याचा ठावठिकाणा माहीत झालेल्या नागरिकांनी याची माहिती तात्काळ संबधित विशेष पथक अथवा नगरपालिकेला कळवावी असे आवाहन मुख्याध्याधिकारी प्रशांत बंडगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.