नागपूर : शंकरनगरातील सरस्वती विद्यालयात शाळेत असताना शेवटच्या बाकावर बसणारा आणि वर्गातील मुले बँक बेंचर म्हणून हिणवत असलेल्या शांत व लाजाळू असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या खुर्चीवर बसण्यासाठी निवड झाली आहे.

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड होणार असल्यामुळे फडणवीस यांच्यासोबत सरस्वती शाळेत शिकणाऱ्या त्यांच्या मित्रानी आनंद व्यक्त केला. शाळेत नेहमीच शांत आणि लाजाळू असणारे देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत हे नक्की झाल्यामुळे त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यावेळेचे ५० मित्र मुंबईला जाणार आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे ही वाचा… ते अखेर ‘आलेच’, त्या फलकांचा अर्थ आत्ता उलगडला

देवेंद्र फडणवीस यांचे शालेय मित्र मुकुल बऱ्हानपुरे यांनी सांगितले, नागपूरच्या शंकर नगर चौकावरील साउथ इंडियन एजुकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्यालयात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होतो.शाळेतील तळ मजल्यावरच्या वर्गात शेवटून दुसऱ्या बाकावर तो बसत होता. अभ्यासात मागे आहे म्हणून त्याना अखेरच्या बाकावर बसावे लागत नव्हते. तर लहानपणी देवेंद्र फडणवीस यांची उंची ही जास्त होती. इतर मुलांच्या तुलनेत ते जास्त उंच असल्याने त्यांना शेवटच्या बाकावर बसावे लागत होते. शाळेत अत्यंत शांत, लाजाळू आणि कधी कधीच बोलणारे होते पण खोडकर होते. अभ्यास हुशात होते मात्र मात्र नियमित अभ्यास करत नसल्यामुळे शाळेतील शिक्षक त्यांना रागावत होते पण दुसऱ्या दिवशी मित्रा विचारुन गृहपाठ पूर्ण करत होते. ते शाळेत एखाद्या विद्यार्थ्याची खोड काढायचे आणि त्यानंतर त्यांची तक्रार केल्यानंतर शाळेतील शिक्षिका त्यावर विश्वास ठेवत नव्हतच्या. इतका साधा मुलगा खोडकर असून शकत नाही अशी शिक्षकांना सहानुभुती त्याला समोसा आवडत होता. त्यामुळे शाळेच्या बाहेर असलेल्या प्रिती कॉर्नर येथे जाऊन त्यावेळी आम्ही सोबत जाऊन समोसा खात होते. शाळेत त्यांचा मोठा भाऊ आशिष होता त्यामुळे भावाचा त्याला धाक होता. त्यामुळे तो शाळेत जास्त मस्ती करत नव्हता मात्र विद्यार्थ्याच्या खोड्या करत होत्या अशी आठवण त्यांनी सांगितली.

हे ही वाचा… फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानापुढे जल्लोष

देवेंद्र फडणवीस यांचे दुसरे शाळेतील मित्र शंशाक कुळकर्णी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी राहत असल्यामुळे त्यांना सोबत घेऊन मी शाळेत जात होतो. दरवर्षी शाळा २४ जूनला सुरू होत असे मात्र तो १ जुलेला शाळेत येत होता. धरमपेठेतून शंकरनगर पर्यंत बसने येत होतो.कधी कधी बसने येत असताना आम्ही तिकिटचे पैसे देत नव्हतो मात्र त्यांना ते आवडत नव्हते. १५ पैसे देऊन तिकिट काढत आम्ही शाळेत येत होतो. त्यांना शाळेत कधीही चिडलेले बघितले नाही. एकत्रित अभ्यास करायची वेळ येत असताना ते कधीही सोबत बसत नव्हते. आज जसे मिश्कील हास्य आहे तसेच त्यावेळी होते. आज पुन्हा तो राज्याचा मुख्यमंत्री होतो आहे याचा आम्हा सर्व मित्राना आनंद आहे.

Story img Loader