सुरक्षा उपाययोजनेचे प्रात्यक्षिक

नागपूर : एयरपोर्ट स्थानकावरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो काही अंतरावर जाताच अचानक थांबवण्यात आली. तांत्रिक कारणामुळे गाडी थांबवण्यात आल्याचे सांगून प्रवाशांना तातडीने पुढच्या स्थानकावर हलवण्यात आले. तेथे पोहोचल्यावर प्रवाशांना हे सुरक्षा प्रात्यक्षिक होते असे सांगण्यात आले.

खापरी ते बर्डी या मार्गावर लवकरच ताशी ८० कि.मी. वेगाने मेट्रो धावणार आहे. या दरम्यान संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या  तपासण्यासाठी आज मंगळवारी  धावती मेट्रो थांबवून प्रवाशांना इतरत्र हलवण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यांना मेट्रोला विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याचे सांगून दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. आपत्कालीन दरवाजातून प्रवासी बाहेर पडले. त्यांना एयरपोर्ट स्थानकावर सुरक्षित पोहोचवण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया वीस मिनिटात पूर्ण करण्यात आली.