अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात अंत्री भागात मंगळवारी सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर आज अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे बसले आहेत.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना जिल्ह्यात आज भूकंपाची घटना समोर आली. गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यांमध्ये भूकंप झाला होता. त्याच दिवशी अकोला जिल्ह्यात देखील भूकंप जाणवल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. मात्र, त्याची कुठलीही नोंद झाली नव्हती. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ६.२७ वाजता जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता २.९ रिश्‍टर स्केल नोंदवली गेली, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत.

Heavy rains in 25 revenue circles in Yavatmal Flood in Khuni river
यवतमाळ जिल्ह्यात पाऊस मुक्कामी! २५ मंडळांत अतिवृष्टी; खुनी नदीला पूर
Heavy rain throughout the day in Yavatmal district
यवतमाळ जिल्ह्यातील २४ मंडळांत अतिवृष्टी, संततधार सुरूच
kolhapur, rain
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर; पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ
Marathwada Earthquake shocks many villages in Taluka of Buldhana District
भूकंप मराठवाड्यात, हादरे बुलडाणा जिल्ह्यात!
Earthquake in Hingoli
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही जाणवले हादरे
buldhana , rain
बुलढाणा जिल्ह्यातील १५ महसूल मंडळांत अतिवृष्टी; लाखो हेक्टरवरील पेरण्या धोक्यात
Buldhana, Collapse, rain, car,
बुलढाणा : जिल्ह्यात कोसळधार! १६ मंडळात अतिवृष्टी; पुरात कार वाहून गेली…
Slight drop in water level in Kolhapur Jambre project was filled to the brim
कोल्हापुरात पाणी पातळीत किंचित घट; जांबरे प्रकल्प काठोकाठ