scorecardresearch

नागपूर : अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार, पीडिता सात महिन्यांची गर्भवती

गावात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर दोघांनी बलात्कार केला. ती मुलगी सध्या सात महिन्यांची गर्भवती आहे.

minor girl gang rape
(प्रतिनिधिक छायाचित्र)

नागपूर : गावात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर दोघांनी बलात्कार केला. ती मुलगी सध्या सात महिन्यांची गर्भवती आहे. या प्रकार उघडकीस येताच वेलतूर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली. प्रवीण बिसन डहाळे (२०, ता. कुही) आणि विलास प्रल्हाद मांढरे (४६, ता. कुही) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुही तालुक्यातील एका गावात राहणारी पीडित मुलगी शिक्षण घेत होती. तिच्या गावात प्रवीण बिसेन हा पाहुणा म्हणून बहिणीकडे राहायला आला. तो शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्याची पीडित मुलीशी मैत्री झाली. दोघांचेही प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनी प्रेमातून शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. मुलीचे आईवडिल शेतात गेल्यावर प्रवीण हा तिच्या घरी येत होता.

हेही वाचा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस वीस वर्षांचा कारावास

गावातच आरोपी विलास मांढरे हा राहतो. विलासला पत्नी व १२ वर्षांची मुलगी आणि ११ वर्षांचा मुलगा आहे. त्याची वाईट नजर त्या मुलीवर होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रवीण हा दुपारी घरी कुणी नसताना मुलीच्या घरात गेला. त्याच्यावर विलास नजर ठेवून होता. शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना विलासने दोघांनाही पकडले. सायंकाळी आईवडिलांना सांगण्याची त्याने धमकी दिली. त्यामुळे दोघेही घाबरले. आता आईवडिल घरातून बाहेर काढणार अशी भीती दोघांनाही होती. तसेच विलासने दोघांना गावात बदनामी करण्याचीही धमकी दिली. दोघेही विलासच्या पाया पडत माफी मागत होते.

हेही वाचा : गडचिरोली : प्रियकराची टाळाटाळ, मारहाण असह्य झाल्याने प्रेयसीने मृत्यूला कवटाळले; चिठ्ठीमुळे झाला उलगडा; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

 विलासने दोघांसमोर एक अट ठेवली. मुलीने शारीरिक संबंध ठेवू दिल्यास कुणालाही न सांगण्याचे कबुल केले. नाईलाजास्तव त्या मुलीने विलासची अट मान्य केली. त्यानंतर मुलीचे आ‌ईवडिल शेतात मजुरीला गेल्यावर विलास त्या मुलीच्या घरात घुसून पीडितेचे शारीरिक शोषण करीत होता. अशाप्रकारे दोघांनीही पीडितेवर वर्षभरापासून अत्याचार केला.

दोघांच्याही लैंगिक शोषणातून पीडिता गर्भवती झाली. तिने दोघांनाही गर्भवती असल्याचे सांगितले. विलासने काढता पाय घेत ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. तर दुसरीकडे प्रियकर प्रवीणची तारांबळ उडाली. गर्भपात करण्याच्या विचारात पाच महिने निघून गेले. पीडित मुलीसाठी दोघांनाही काहीही प्रयत्न केले नाही.

शेवटी तिच्या आईवडिलांच्या प्रकार लक्षात आला. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेलतूर पोलीस ठाण्यात प्रियकर प्रवीण आणि विलासवर बलात्काराचा गुन्हा दाखल दाखल करून अटक करण्यात आली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-08-2022 at 11:17 IST
ताज्या बातम्या