भंडारा : आज इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचेच झाले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेब्रुवारी २०२३ यावर्षीच्या बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून पहिला पेपर इंग्रजी भाषेचा होता. इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या प्रश्नपत्रिकेत a-३,a-४, a-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले. काही विद्यार्थ्यांनी तर गोंधळून प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने तयार केलेल्या ‘मॉडेल आन्सर’ मधील a-३, a-४, a-५ ही उत्तरे सूचानासह जशीच्या तशीच कृतिपत्रिकेत छापून आली आहेत.

हेही वाचा… भंडाऱ्यात इंग्रजीचा पेपर पाहून विद्यार्थीनी झाली बेशुद्ध; ‘कॉपी मुक्त’सोबतच ‘ताण मुक्त’ अभियानही राबवण्याची गरज!

हेही वाचा… “संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यांच्या मेंदूचा केमिकल…”, बच्चू कडूंची ‘त्या’ आरोपांवरून टीका!

कृतिपत्रिकेतील चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात सरसकट ६ गुण द्यावेत, अशी मागणी भंडारा येथील इंग्रजी विषयाचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक नदीम खान यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mistakes in 12th std board english paper instead of question paper model answer paper printed ksn asj
First published on: 21-02-2023 at 16:41 IST