scorecardresearch

‘खासदार संजय राऊत पिसाळलेला **, मनोरुग्ण!’; आमदार संजय गायकवाड यांची जहरी टीका

तुम्ही अडीच वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची चाटूगिरी केली त्याचे काय? अशा शब्दांत आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

MLA Sanjay Gaikwad on sanjay raut
‘खासदार संजय राऊत पिसाळलेला **, मनोरुग्ण!’; आमदार संजय गायकवाड यांची जहरी टीका (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

बुलढाणा : खासदार संजय राऊत हे पिसाळलेला ** असून मनोरुग्ण आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. मग, महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही अडीच वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची चाटूगिरी केली त्याचे काय? अशा शब्दांत आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून राज्यात दोन्ही गटांत शाब्दिक संघर्ष सुरू असून, जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक आमदार गायकवाड यांनी आज संजय राऊत यांच्या ‘चाटूगिरी’ विधानाचा खरपूस समाचार घेतला. खासदार राऊत हे मानसिक रुग्ण असल्याने आम्ही त्यांच्या विधानाची गंभीर दखल घेत नाही. जेव्हा ते समोरासमोर येतील तेव्हा त्यांचे काय करायचे ते ठरवू, असा गर्भित इशाराही गायकवाड यांनी दिला आहे.

हेही वाचा – बुलढाणा : ‘‘ठाणेदार साहेब, आमचा चोरलेला पक्ष आणि धनुष्यबाणाचा तपास लावा हो!”

हेही वाचा – चंद्रपूर : चांदा आयुध निर्माणीत बिबट्याचा महिलेवर हल्ला; सेक्टर पाचमधील घटना

‘कुणाचा बाप आला तरी कार्यालयाचा ताबा घेऊ देणार नाही’ या राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, त्याच्याकडे आता सैनिकच कुठे उरले आहेत? असा प्रतिप्रश्न गायकवाड यांनी केला. आता पक्ष व धनुष्यबाण आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे तेच आमच्याकडे येतील, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 22:28 IST
ताज्या बातम्या