नागपूर : एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर बॅटरी कार वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शहरातील एका भाजप आमदाराच्या पुत्राने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. मात्र. रेल्वेचे अधिकारी याबाबत मौन बाळगून आहेत. आमदार पुत्र सोमवारी दुपारी मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावरील उपस्टेशन प्रबंधक कार्यालय (वाणिज्य) येथे आला.

हेही वाचा : नागपूर : बिबट्याने प्राणीसंग्रहालयात शिरून केली काळविटाची शिकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फलाटावर पोहोचविण्यासाठी बॅटरीवर चालणा-या गाडीची मागणी कार्यालयात उपस्थित महिला कर्मचाऱ्याला केली. गाडी एका प्रवाशाला सोडण्यास गेली होती, त्यामुळे ती मिळण्यास उशीर होईल असे कर्मचाऱ्यांने सांगितले. त्यामुळे आमदार पुत्र संतापला. महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. आपण ‘ आमदारांचा मुलगा आहे. मला ओळखत नाही का?’ असे म्हणत त्या महिलेचा पाणउतारा केला. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी आपल्याकडे अजूनपर्यंत अशी कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगितले.