नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अकरा वर्षापेक्षा अधिक काळ पूर्ण झाला आहे. यादरम्यान नव्या नोकऱ्यांत घट झाल्याचा आरोप अनेकदा होतो. सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने दरवर्षी २ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचा दावा केला होता. नोकऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी मोदी सरकारने लेबर आणि स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीने मोठे बदल केले होते. आता मोदी सरकारने सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठीही मोठी संधी दिली आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया तब्बल ४८८७ पदांसाठी होत आहेत.
आता अजिबात उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही कुठेही बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रिया केंद्रीय गुप्तचर विभागाकडून राबवली जात आहे. विविध पदांसाठी भरती सुरू आहे. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकतात. केंद्र शासनाची नोकरी करण्याचा मोक्का तुमच्याकडे आहे. सिक्योरिटी असिस्टंट आणि एक्झिक्युटिव्ही ही पदे भरली जाणार आहेत. २६ जुलै २०२५ पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही १७ ऑगस्ट २०२५ आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.
या भरतीसाठी आपल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायच्या आहे. http://www.mha.gov.in/en/notifications/vacancies या साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी सरकारी नियमानुसार आरक्षण लागू आहे. त्यानुसारच पदे भरली जातील. उमेदवाराकडे दहावी पासचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबत भरती प्रक्रियेसाठी वयाचीही अट लागू करण्यात आलीये. १८ ते २६ वयोगटातील लोक भरतीसाठी अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवारांना ५५० रूयये फिस लागणार आहे तर पुरूष उमेदवारांना ६५० फिस लागेल. मुलाखत, व्यक्तीमहत्व चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतरच निवड ही केली जाईल. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करा.