नागपूर : राज्यात नऊ जूनला मान्सूनचा प्रवेश होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, आता मान्सूनच्या आगमनाबाबत कोणतीही घोषणा हवामान खात्याने केली नाही. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त हुकल्याच्या चर्चेला वेग आला आहे. भारतीय हवामान खात्याने केरळमध्ये देखील मान्सून दाखल होण्याच्या अंदाज सोमवारी दिला नाही. त्यामुळे मंगळवारी म्हणजेच आज तरी तो दाखल होईल का, याबाबत शंका आहे. यापूर्वी खात्याने चार जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात नऊ जूनला मान्सूनच्या प्रवेशाचा अंदाज दिला हाता. मात्र, देशातच त्याच्या प्रवेशाची नांदी मिळाली नाही. त्यामुळे राज्यातही त्याच्या आगमनाबाबत शंका आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळाच्या अनेक चर्चा होत्या. त्याबाबतही खात्याने अजूनपर्यंत स्पष्ट असा इशारा दिला नाही. तरीही वाऱ्यांची स्थिती आणि वेग पाहता किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच भागामध्ये येत्या चोवीस तासात कबी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता पुढील ४८ तासांमध्ये वाढू शकते.

हेही वाचा >>> अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती; महाराष्ट्रालाही बसणार फटका!

त्यामुळे किनारपट्टीवर आर्द्रता वाढून कोकण विभागात आठवड्याच्या अखेरीस पाऊस पडू शकेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार सात ते आठ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार होऊ शकते. आठ जूनच्या दरम्यान केरळमध्ये चांगल्या पावसाची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. हवामानाचे दोन वेगवेगळे मॉडेल वेगवेगळी स्थिती दर्शवत असल्याने मान्सूनच्या आगमनाबाबतची स्थिती स्पष्ट नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon will enter the state on june 9 indian meteorological department rgc 76 ysh
First published on: 06-06-2023 at 11:42 IST