scorecardresearch

कामानिमित्त बाहेर गेलेली आई अचानक घरात आली, अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत ‘नको त्या अवस्थेत’ दिसली अन्..

मुलगी आशीषसोबत ‘नको त्या’ अवस्थेत दिसून आली. त्यामुळे चिडलेल्या आईने आशीषची चांगली धुलाई केली.

कामानिमित्त बाहेर गेलेली आई अचानक घरात आली, अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत ‘नको त्या अवस्थेत’ दिसली अन्..
संग्रहित छायाचित्र /लोकसत्ता

नागपूर : नवव्या वर्गात शिकणारी मुलगी अभ्यासाच्या खोलीत प्रियकरासोबत ‘नको त्या’ अवस्थेत सापडली. त्यामुळे आईने मुलीला व तिच्या प्रियकराला चांगला चोप दिला. या प्रकरणात मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक आशीष (२१) हा कुही तालुक्यातील एका खेड्यात राहतो. त्याच्या वस्तीत १५ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) राहते. आशीष हा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) प्रशिक्षण घेतो. दोघांचे गेल्या काही महिन्यांपूर्वी सूत जुळले. एकमेकांवर प्रेम करणारे आशीष आणि रिया हे दोघेही चोरून एकमेकांना भेटत होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची वस्तीत कुणकुण होती. परंतु, दोघांच्याही कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमप्रकरणाबाबत माहिती नव्हती.

प्रथम सत्राची परीक्षा सुरू असल्याने रियाने घरी राहून अभ्यास करायचे ठरवले होते. मुलीच्या अभ्यासात अडचण येऊ नये म्हणून तिची आई वस्तीतील एका नातेवाईक महिलेच्या घरी मुलाला घेऊन गेली होती. दोन तासात परत येणार असे सांगून गेल्याने मुलीने तासभर अभ्यास केला. त्यानंतर तिच्या प्रियकराचा फोन आला. त्याने घरी कुणी आहे का? अशी विचारणा केली. तिने आई बाहेर गेल्याचे सांगताच आशीष तिच्या घरी आला.

हेही वाचा : नागपूर : बेवडा म्हटल्यामुळे युवकाचा दगडाने ठेचून खून

या दरम्यान मुलीची आई काही कामानिमित्त घरी आली. आई घरात येताच तिने दरवाजा ढकलला. मुलगी आशीषसोबत ‘नको त्या’ अवस्थेत दिसून आली. त्यामुळे चिडलेल्या आईने आशीषची चांगली धुलाई केली. त्यानंतर मुलीलाही कानशिलात लावली. दोघीही मायलेकी कुही पोलीस ठाण्यात गेल्या. मुलीने आशीषने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तक्रारीवरून आशीषविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या