चंद्रपूर : बारावीचा इंग्रजीचा पेपर, नवरा कामावर गेलेला अन् सोबतीला दोन महिन्यांचं चिमुकलं बाळ… घरी सांभाळ करणारं कुणीच नाही. दुसरीकडे, पेपरही महत्त्वाचा. अशात ती आई दोन महिन्यांच्या तान्हुल्याला सोबत घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचली. केंद्राबाहेर एका झाडाखाली झुला तयार केला. त्यात तान्हुल्याला झोपवून ती परीक्षा देण्यासाठी सज्ज झाली. एका आईचे ममत्व अन् शिक्षणाप्रती गोडी पाहून सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला पोलिसाने आपले कर्तव्य बजावत त्या तान्हुल्याचा तीन तास सांभाळ केला. या दोन्ही महिलांना पाहून उपस्थितही भारावून गेले.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथील जनता विद्यालयातील हा प्रकार. भाग्यश्री रोहित सोनूने या कोठारी येथील रहिवाशी आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन महिन्यांचे बाळ आहे. पती रोजीरोटी करून आपल्या संसाराच गाडा कसाबसा हाकतो. भाग्यश्रीला शिक्षण घेण्याची इच्छा होती. तिने बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पतीनेही तिला साथ देत प्रोत्साहन दिले. बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर होता. पती नेहमीप्रमाणे कामावर गेलेत. आता परीक्षा तर द्यायची पण घरी बाळाचा सांभाळ करण्यासाठी कुणीच नाही. अशा स्थितीत काय करायचे असा प्रश्न तिच्यासमोर होता. अशात दोन महिन्यांच्या बाळाला घेत ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. केंद्रालगत असलेल्या एका झाडाला तिने पाळणा बांधला, बाळाला या पाळण्यात झोपवून ती पेपर द्यायला गेली. पेपर सोडविताना अधूनमधून ती बाळाला बघायला बाहेर यायची.

D Y Chandrachud News in Marathi
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयांच्या ‘या’ कृतीवर व्यक्त केली चिंता; म्हणाले, “जे खटले १० महिन्यांपेक्षा जास्त…”
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द
Morbi bridge
१३५ जणांचा जीव घेणाऱ्या मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपीला अखेर जामीन, पण कोर्टाने घातल्या ‘या’ अटी
nashik district head masters union, disbursement of differential payments
नाशिक : शिक्षक-शिक्षकेतरांची फरक देयके त्वरीत द्यावीत, जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी

हेही वाचा – वर्धा : विजेचा धक्का लागून मजुराचा मृत्यू, शेतमालकावर मनुष्यवधाचा गुन्हा

हेही वाचा – ओबीसींची ७२ वसतिगृहांऐवजी ५२ वसतिगृहांवर बोळवण; विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी ५ मार्चपासून अर्ज आमंत्रित

परीक्षा केंद्रावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. तिने भाग्यश्रीला ‘तू पेपर सोडव मी बाळाकडे लक्ष देते,’ असे सांगितले. संपूर्ण पेपर होईपर्यत त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने बाळाकडे लक्ष दिले. एकदाचा पेपर संपला अन् मुलाला पाहून भाग्यश्रीच्या जिवात जीव आला. भाग्यश्रीची धावपळ आणि महिला पोलिसाची संवेदनशीलता पाहून उपस्थितही भारावून गेले.